एक्स्प्लोर
शिवस्मारक म्हणजे शुद्ध फसवणूक, राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बांधणं ही शुद्ध फसवणूक असल्याचा घणाघात राज ठाकरे यांनी केला. ‘शोध मराठी मनाचा’ या 14 व्या जागतिक मराठी संमेलनात ते बोलत होते.
जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली त्यावेळी नोटबंदी ते बुलेट ट्रेन अशा सर्वच मुद्द्यांवर राज ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. मुंबई ते दिल्ली सर्वाधिक विमान प्रवास होत असताना केवळ अहमदाबादलाच बुलेट ट्रेन का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा मुंबईला तोडण्याचा डाव असल्याचं त्यांनी सांगितलं.
नोटाबंदीचाही राज ठाकरेंकडून समाचार
“नवीन 2 हजाराची नोट मला एका मित्राने दाखवली, तेव्हा लहानपणी खेळायचो ना 'व्यापार' त्यातली ती नोट वाटली. नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदींची बॉडी लॅंग्वेज बघा. चुकलेली स्पष्ट दिसते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर 60 निर्णय बदलले, हे काय तयारीनिशी घेतलेल्या निर्णयाचं लक्षण नव्हे.”, अशी टीका राज ठाकरेंनी केली. शिवाय, येत्या काळात नोटाबंदीवर सविस्तर बोलणार असल्याचेही राज ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचं व्यंगचित्र काढलं.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement