एक्स्प्लोर
पोलिसांनी आंदोलक प्रवाशांना हटवलं, वाशिंदमधील रेलरोको मागे
मागील तीन दिवसांपासून टिटवाळा ते आसनगाव मार्गावरील लोकलसेवा बंद आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.
ठाणे : वाशिंद रेल्वे स्थानकावरील रेलरोको मागे घेण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांनी आंदोलक प्रवाशांना रुळावरुन बाजूला हटवल्यानंतर अडवलेली रेल्वे सोडण्यात आली. सकाळी 8.15 वाजता सुरु झालेला रेलरोको 8.50 वाजता संपला.
मागील तीन दिवसांपासून टिटवाळा ते आसनगाव मार्गावरील लोकलसेवा बंद आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. मुंबईत कामाला येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. अखेर आज संताप अनावर झाल्याने प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकावर सकाळी दादरहून अमृतसरला जाणारी एक्स्प्रेस रोखली.
मात्र रेल्वे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन आंदोलक प्रवाशांना रुळावरुन हटवून अडवलेली रेल्वे रवाना केली. त्यानंतर प्रवाशांनी रेलरोको मागे घेतला.
दरम्यान, दुरांतो अपघातामुळे बंद पडलेला आसनगाव-कल्याण अप रेल्वेमार्ग अजूनही वाहतुकीसाठी बंदच आहे. या रेल्वे मार्गाची दुरुस्ती अजूनही सुरुच आहे. त्यामुळेही प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement