एक्स्प्लोर
आज भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल : विखे पाटील
पैसे घेऊन काम झालं नाही म्हणून चक्क मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होण्याचा एक आगळावेगळा ‘पराक्रम’भाजप-शिवसेना सरकारच्या नावे नोंदला गेला आहे, अशी टीका विखे पाटलांनी केली.
मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या दालनात झालेल्या मारहाण प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू शकते, असं ते म्हणाले.
फाईल मंजूर करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या पीएला दहा लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप उस्मानाबादचे अरुण निटुरे यांनी केला. मात्र तरीही काम न झाल्याने निटुरे यांनी मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्याला मारहाण केली.
या सरकारने पारदर्शक कारभाराचे आश्वासन दिलं होतं आणि मंत्रालयात नेमका कसा कारभार सुरू आहे, ते आता अगदी‘पारदर्शक’ पद्धतीने समोर आलंय. पैसे घेऊन काम झालं नाही म्हणून चक्क मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होण्याचा एक आगळावेगळा ‘पराक्रम’भाजप-शिवसेना सरकारच्या नावे नोंदला गेला आहे, अशी टीका विखे पाटलांनी केली.
ही घटना राज्य सरकारला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या घटनेसाठी राज्य सरकारची भ्रष्टाचाराप्रती उदासीन आणि मवाळ भूमिका कारणीभूत आहे. राज्यातील निम्म्याहून अधिक मंत्र्यांवर ठोस पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना अभय देण्याचेच उघड प्रयत्न झाले. त्यामुळे हे सरकार भ्रष्टाचाराविरूद्ध कोणतीही कारवाई करू शकत नाही, असा स्पष्ट संदेश सर्वत्र गेल्याचं विखे पाटील म्हणाले.
मंत्री तर मंत्री पण त्यांचे अधिकारीही आता खुलेआम भ्रष्टाचार करताना दिसत आहेत. त्याचा परिणाम म्हणून आता पैसे देऊन काम न झालेली मंडळी दिवसाढवळ्या मंत्रालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण करू लागली आहेत. हीच वेळ उद्या मंत्र्यांवर आली तरी फारसे आश्चर्य वाटणार नाही. ही या सरकारच्या कर्माची फळे असतील, अशी बोचरी टीका विखे पाटील यांनी केली.
संबंधित बातम्या :
मंत्रालय मारहाण प्रकरण : राजकुमार बडोलेंची प्रतिक्रिया
मंत्री राजकुमार बडोलेंच्या पीएला 10 लाख दिले: अरुण निटुरे
पैसे घेऊनही काम नाही, मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्याची धुलाई!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement