एक्स्प्लोर

उद्योगपतींचं कर्ज माफ, मग शेतकऱ्यांचं का नाही? : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतं मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हात आखडतं का घेतं? असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसोबतच अनेक मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. कर्जमाफी द्यायची नसेल तर दुसरा पर्याय सरकारनं द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. देशातील 9 उद्योगपतींकडे साडेआठ लाख कोटींचं कर्ज आहे. त्यांच कर्ज सरकार माफ करतं. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेण्यास सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 2006 साली महाराष्ट्रात दुष्काळ असताना तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं दुष्काळी भागाचा दौरा केला. केंद्राकडे पाठपुरावा करत शेतकऱ्यांचं 72 हजार कोटींचं कर्ज माफ केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर त्यांचा सातबारा कोरा होणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सरकारी यंत्रणा ढासळलेली आहे, ती शेतकऱ्यांना हात देऊ शकत नाही असा आरोपही त्यांनी केला. उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफी, महाराष्ट्रात का नाही? उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आल्यानंतर लगेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. यूपीच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. राज्य सरकारला कर्ज घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं सहज शक्य आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. कर्जमाफीतून मुख्यमंत्र्यांना पळवाट नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना पळवाट काढता येणार नाही. त्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल. सरकारनं सत्तेत येताना दिलेली आश्वासनं पूर्ण करावी लागतील. अन्यथा सरकारकडे 2019 च्या निवडणुकीत जाहीरनाम्यासाठी मुद्दे नसतील. आयात निर्यात धोरण राबवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करायचं असेल तर विमा योजनाही सक्षम करणं आवश्यक असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्याला चांगला हमीभाव देणं गरजेचं आहे. ग्राहकाच्या हिताचा विचार करताना शेतकऱ्यांच्याही हिताचा विचार सरकारनं केला पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना वीज, पाणी देणं ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकार ते जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलं आहे. सरकारच्या याच धोरणामुळे मराठवाड्यातील गुंतवणुक कमी झाली असा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. गोंधळ घालणाऱ्या 90 आमदारांपैकी फक्त 19 जणांचंच निलंबन का? राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एकूण 90 आमदारांनी गोंधळ घातला. मात्र सरकारनं फक्त 19 आमदारांचंच निलंबन केलं, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवर निशाणा साधला. बँका सर्वांना कर्ज देतात, पण शेतकऱ्यांवर निर्बंध लावतात. ते निर्बंध न लादता शेतकऱ्यांना कर्जवाटप होणं गरजेचं आहे. कर्ज घेणं आणि फेडणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. त्यांना तो मिळाला पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी द्यावी, मी स्वत: त्यांना हार घालेन : पृथ्वीराज चव्हाण सध्याचं सरकार पारदर्शक नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरलंय. पण मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली, तर मी स्वत: त्यांना हार घालेन असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. आम्हाला श्रेय नको, पण महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे असंही ते पुढे म्हणाले. महाराष्ट्रातील पाणी, नागरी प्रशासनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, मात्र सरकारचं दुर्लक्ष होत आहे. असा आरोपही त्यांनी यावेळी केला
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : दरोड्याचा प्लॅन आखला, वाटेत पोलिसांनी गाठलं, एकाचा पोलिसांवर फायरिंगचा प्रयत्न; पिस्तूल काढताना चुकून ट्रिगर दाबलं अन्...; नाशिकमध्ये मध्यरात्री थरार
दरोड्याचा प्लॅन आखला, वाटेत पोलिसांनी गाठलं, एकाचा पोलिसांवर फायरिंगचा प्रयत्न; पिस्तूल काढताना चुकून ट्रिगर दाबलं अन्...; नाशिकमध्ये मध्यरात्री थरार
Rohit Pawar : रोहित पवारांना कर्जतमध्ये दुसरा धक्का, आधी नगराध्यक्षांचा राजीनामा, आता 'ती' मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली
रोहित पवारांना कर्जतमध्ये दुसरा धक्का, आधी नगराध्यक्षांचा राजीनामा, आता 'ती' मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली
डोनाल्ड ट्रम्प- झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊसमधील राड्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी रोममध्ये पुन्हा भेटले; आता ट्रम्प म्हणतात, 'मला वाटतंय पुतीन मला नुसतंच...'
डोनाल्ड ट्रम्प- झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊसमधील राड्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी रोममध्ये पुन्हा भेटले; आता ट्रम्प म्हणतात, 'मला वाटतंय पुतीन मला नुसतंच...'
Pope Francis : पोप फ्रान्सिस अनंतात विलीन; 170 देशांचे प्रतिनिधी अन् लाखोंचा जमाव अंत्यदर्शनासाठी पोहोचले
पोप फ्रान्सिस अनंतात विलीन; 170 देशांचे प्रतिनिधी अन् लाखोंचा जमाव अंत्यदर्शनासाठी पोहोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Gaikwad On Devendra Fadnavis | पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन संजय गायकवाडांची दिलगिरीTourist In Srinagar Kashmir after Pahalgam | पहलगाम हल्ल्यानंतर अनेक मराठी पर्यटक श्रीनगरमध्ये दाखलJammu Kashmir Pahalgam Update | दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यातEknath Shinde Buldhana | कार्यकत्यांचे आभार मानण्यासाठी आज बुलढाण्यात एकनाथ शिंदेंची आभार यात्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : दरोड्याचा प्लॅन आखला, वाटेत पोलिसांनी गाठलं, एकाचा पोलिसांवर फायरिंगचा प्रयत्न; पिस्तूल काढताना चुकून ट्रिगर दाबलं अन्...; नाशिकमध्ये मध्यरात्री थरार
दरोड्याचा प्लॅन आखला, वाटेत पोलिसांनी गाठलं, एकाचा पोलिसांवर फायरिंगचा प्रयत्न; पिस्तूल काढताना चुकून ट्रिगर दाबलं अन्...; नाशिकमध्ये मध्यरात्री थरार
Rohit Pawar : रोहित पवारांना कर्जतमध्ये दुसरा धक्का, आधी नगराध्यक्षांचा राजीनामा, आता 'ती' मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली
रोहित पवारांना कर्जतमध्ये दुसरा धक्का, आधी नगराध्यक्षांचा राजीनामा, आता 'ती' मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली
डोनाल्ड ट्रम्प- झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊसमधील राड्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी रोममध्ये पुन्हा भेटले; आता ट्रम्प म्हणतात, 'मला वाटतंय पुतीन मला नुसतंच...'
डोनाल्ड ट्रम्प- झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊसमधील राड्यानंतर पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारावेळी रोममध्ये पुन्हा भेटले; आता ट्रम्प म्हणतात, 'मला वाटतंय पुतीन मला नुसतंच...'
Pope Francis : पोप फ्रान्सिस अनंतात विलीन; 170 देशांचे प्रतिनिधी अन् लाखोंचा जमाव अंत्यदर्शनासाठी पोहोचले
पोप फ्रान्सिस अनंतात विलीन; 170 देशांचे प्रतिनिधी अन् लाखोंचा जमाव अंत्यदर्शनासाठी पोहोचले
Nashik Crime : जाधव बंधू हत्या प्रकरण : कोयते, रक्ताने माखलेले कपडे अन् मोबाईल पोलिसांकडून जप्त, संशयितांचा एसआयटीकडे ताबा, तपासाला वेग
जाधव बंधू हत्या प्रकरण : कोयते, रक्ताने माखलेले कपडे अन् मोबाईल पोलिसांकडून जप्त, संशयितांचा एसआयटीकडे ताबा, तपासाला वेग
BSF jawan captured by Pakistan : तब्बल 80 तास अन् अधिकाऱ्यांचा तीन बैठका होऊनही 'तो' बीएसएफ जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! माहिती सुद्धा देईनात, आतापर्यंत काय काय घडलं?
तब्बल 80 तास अन् अधिकाऱ्यांचा तीन बैठका होऊनही 'तो' बीएसएफ जवान अजूनही पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात! माहिती सुद्धा देईनात, आतापर्यंत काय काय घडलं?
Gadchiroli ST Bus : पहिल्यांदाच एसटी पोहोचलेलं गाव, नक्षलग्रस्त भागात जल्लोषात स्वागत, पाहा Photos
पहिल्यांदाच एसटी पोहोचलेलं गाव, नक्षलग्रस्त भागात जल्लोषात स्वागत, पाहा Photos
Nashik Crime : तडीपार गुन्हेगाराला भरदिवसा घरात घुसून संपवलं, 14 जणांनी वाजवला 'गेम', नाशिकमध्ये खळबळ
तडीपार गुन्हेगाराला भरदिवसा घरात घुसून संपवलं, 14 जणांनी वाजवला 'गेम', नाशिकमध्ये खळबळ
Embed widget