एक्स्प्लोर

Bacchu Kadu Protest: ऑनलाईन गेमिंगविरोधात बच्चू कडू आक्रमक, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन, भारतरत्न परत द्याची घोषणाबाजी

Bacchu Kadu Protest: ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करत असल्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केलं आहे.

Bacchu Kadu Protest at Sachin Tendulkar House: प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) सध्या मुंबईत (Mumbai News) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या घराबाहेर आंदोलन करत आहेत. सचिन ऑनलाईन गेमिंगची (Online Gaming) जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करत असल्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी यापूर्वीही सचिन तेंडुलकरवर नाराजी व्यक्त केली होती. 

बच्चू कडू म्हणाले की, "खरं तर आम्हाला बरेच फोन, मेसेज येत आहेत. काही ठिकाणी तर पैसा गुंतवून या जुगारावर लावला आहे. ऑनलाईन गेमिंगची तुम्ही जर जाहीरात करताय, तर मग मटक्याचीही करा, ते कशाला सोडताय? भारतरत्न असल्यामुळे आम्ही आंदोलन करत आहे. ते फक्त क्रिकेटर असते तर आम्ही आंदोलन केलं नसतं. या देशात भगतसिंहांना भारतरत्न मिळाला नाही, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही, महात्मा फुलेंना मिळाला नाही. मग ज्यांना भारतरत्न मिळाला ते जर गैरफायदा घेत आहेत."

Bacchu Kadu Protest: ऑनलाईन गेमिंगविरोधात बच्चू कडू आक्रमक, भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन, भारतरत्न परत द्याची घोषणाबाजी

गणेशोत्सवात सचिनच्या नावाच्या दानपेट्या 10 दिवस ठेवणार : बच्चू कडू 

"सचिन तेंडुलकरचे चाहते खूप आहेत. त्यामुळे ते करत असलेल्या जाहीरातीचा परिणाम लहान मुलांपासून सगळ्यांवर होत आहे. त्यामुळे आमची साधी मागणी आहे की, तुम्ही जाहीरातीतून बाहेर निघावं किंवा मग भारतरत्न परत करावा. हे जर झालं नाही, तर येणाऱ्या गणेशोत्सवात आम्ही प्रत्येक गणेशमंडळात दानपेटी ठेवणार आहोत. 10 दिवस ही दानपेटी गणेशमंडळात ठेवणार. त्यानंतर त्या सर्व दानपेट्यांमधील रक्कम एकत्र करुन सचिन तेंडुलकरांना देणार" , असं बच्चू कडू म्हणाले आहेत. 

ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होत आहे. कित्येक उदाहरणं आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे आत्महत्या झाल्यात, हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतरत्न असूनही अशा गोष्टीची जाहीरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. आम्हाला क्रिकेटपटू म्हणून त्यांचा अभिमान आहे, पण भारतरत्न म्हणून जर ते अशा जाहीराती करत असतील तर ते मात्र मान्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले. 

ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींना बळी पडू नका; बच्चू कडू यांचं तरुणांना आवाहन 

"ऑनलाईन गेमिंगच्या जाहीराती कोणीही करु, पण आपण अशा जाहीरातींपासून लांब राहिलं पाहिजे. गरीब, मध्यमवर्गीय समाजच या गेमिंगमुळे होरपळून निघाला आहे. बऱ्याच राज्यांमध्ये अशा गेमिंगना बंदी घालण्यात आली आहे. अशातच आपल्या राज्यातही अशा गेमिंगवर बंदी घालावी अशी विनंतीही आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. तसेच, तरुणांनाही आमचं आवाहन आहे, ऑनलाईन गेमिंगपासून दूर राहा, अशा जाहीरातींना बळी पडू नका", असं आवाहनही बच्चू कडू यांनी केलं आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaUddhav Thackeray : बाळासाहेबांची रूद्राक्षाची माळ मी घराणेशाहीत घेतली - ठाकरेUddhav Thackeray : बाळासाहेबांचा जिव्हाळा असलेल्या शहरात झालेला गद्दाराचा विजय खटकलाUddhav Thackeray on Amit Shah : अमित शाहांना नवरत्न तेल द्या; बुद्धी तल्लख होईल - उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
मोदीजी ऐका... मी राहुल गांधींची बहीण, बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेते; PM मोदींच्या चॅलेंजवर प्रियांका गांधींचं शिर्डीतून प्रत्युत्तर
Dilip Walse Patil: 'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
'मी शरद पवारांचा मानसपुत्र हे लोक म्हणायचे', पवारांबद्दल बोलताना वळसे पाटील भावूक
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
Mike Tyson vs Jake Paul : 27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
27 वर्षाचा तरणा पोरगा 'द माईक टायसन'शी भिडला, 338 कोटींच्या बॉक्सिंग सामन्याची जगभरात चर्चा; कोण हारलं कोण जिंकलं?
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
×
Embed widget