एक्स्प्लोर
सहा वर्षांनीही मूल नसल्याने पत्नीची हत्या, पतीची आत्महत्या

मुंबई : पत्नीची हत्या करुन पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या पवईत उघडकीस आली आहे. मूल न होण्याच्या वादावरुन हे हत्याकांड घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुरेश बीजे आणि प्रीती बीजे असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. लग्नाला सहा वर्षे उलटूनही मूल होत नसल्यामुळे दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत असल्याची माहिती आहे.
याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर पतीने पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पतीने हातोड्याने पत्नीच्या डोक्यावर वार केल्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















