एक्स्प्लोर
वसईतील उच्चभ्रू वस्तीतील कुंटणखान्याचा पर्दाफाश
वसई: वसईत उच्चभ्रू वस्तीतील एका घरामध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आनंदनगर भागातील सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून सात पिडीत महिला व तरुणीची सुटका केली. तर कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे.
वसई पश्चिमेकडील आनंदनगर परिसरातील रोजमॅक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा कुंटणखाना चालत होता. महिला तरुणींना पैशाचे अमिष दाखवून यात ओढलं जातं होतं. त्यानंतर गिऱ्हाईकाला मोबाईलवर संपर्क साधून हा वेश्याव्यवसाय सुरु होता.
मागील सहा महिन्यापासून या ठिकाणी हा गोरखधंदा सुरु असल्याचं समोर आलं आहे. कुंटणखाना चालवण्याऱ्या अशोक तांबे आणि नर्गीस शहीद खान यांना अटक केली आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी एबीपी माझानं दादरमधील उच्चभ्रू परिसरात सुरु असणाऱ्या खुलेआम देहविक्रीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी येथील हॉटेलवरही कारवाई केली. ही कारवाई ताजी असतानाच वसईतील ही धटना समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement