एक्स्प्लोर
राणीच्या बागेत पेंग्विनची एन्ट्री
मुंबई : मुंबईतील राणीच्या बागेत नव्या पाहुण्यांनी एन्ट्री केली आहे. अतिशय दुर्मिळ असा पेंग्विन भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्राहलयात दाखल झाला आहे. आजवर हा प्राणी आपण फक्त चित्रात किंवा पुस्तकात पाहिला होता. मात्र, आता हा पेंग्विन मुंबईकरांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
दक्षिण कोरियाच्या क्वँक्स अँक्वेरिअममधून आणण्यात येणारे, 8 पेंग्विन पहाटे चार वाजता मुंबईच्या विमानतळावर दाखल झाले. सध्या हे पेग्विन भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्राहलयात एक ते दीड महिना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण 8 पेंग्विन आणण्यात आले असून यातील 3 नर, तर 5 मादी जातीचे पेंग्विन आहेत. या पेंग्विनची काळजी घेण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन एजन्सीला पाच वर्षांचे कंत्राट देण्यात आलं आहे. या पेंग्वीनसाठी नेमण्यात आलेल़्या एजन्सीला 7-8 कोटींच्या खर्चाचे कंत्राट देण्यात आले आहे. याशिवाय पेंग्विनसाठी राणीच्या बागेत वेगळी व्यवस्था उभारण्यासाठीही 7-8 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement