एक्स्प्लोर

सावधान! वेब सीरिज अन् चित्रपटांच्या माध्यमातून होतोय सायबर फ्रॉड; पोलिसांकडून नावं जाहीर

तुम्ही जर ऑनलाईन वेब सीरिज किंवा चित्रपट पाहात असाल तर सावधान! कारण, या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सायबर पोलिसांकडे आल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी वेब सीरिज आणि चित्रपटांची नावांची यादी जाहीर केली आहे.

मुंबई : तुम्ही जर ऑनलाईन एखादी वेबसिरीज किंवा चित्रपट फ्री पाहत असाल तर आधी ही बातमी पाहा. महाराष्ट्र सायबर सेलने अश्या काही चित्रपट आणि वेब सीरीजची नावं दिली आहेत. ज्यांचा वापर करुन सायबर फ्रॉड तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस टाकून तुमच्यावर सायबर अॅटक करतात. लॉकडाऊनच्या काळात काही फ्री वेबसाईट वर प्रसिद्ध चित्रपट आणि वेब सीरीज फ्री मध्ये दाखवण्यात येत असल्याचं म्हटलं जातं. जेव्हा एक व्यक्ती या साईटवर क्लिक करते तेव्हा एक MALWARE तुमच्या मोबाइल, कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करुन तुमचा सगळा डेटा हॅक करतो आणि त्याचा वापर करुन भामटे नागरिकांना त्रास देतात, खंडणी मागतात. सायबर सेलने अश्या चित्रपट आणि वेब सीरीजची नावं जाहीर केली आहेत. लॉकडाऊन दरम्यान देशातील कोट्यवधी लोक ऑनलाइन चित्रपट किंवा वेब मालिका पाहत आहेत. अशा परिस्थितीत सायबर फ्रॉडने लोकांच्या याच सवईला फसवण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. खरं तर, देशात असे बरेच लोक आहेत जे कायदेशीर ओटीटी प्लॅटफॉर्मची सदस्यता घेत नाहीत आणि इंटरनेटवर बेकायदेशीरपणे चित्रपट किंवा वेब मालिका पाहतात. असे करणे धोकादायक आहे कारण हीच सवय आपल्याला अडचणीत आणू शकते. जेव्हा तुम्ही बेकायदेशीर वेबसाइटवर चित्रपट किंवा वेब मालिका पाहायला जाता. तेव्हा ही साइट उघडताच मालवेयर (व्हायरस) आपल्या मोबाइल किंवा संगणकात जातो. हा मालवेयर तुमचे पासवर्ड किंवा वैयक्तिक माहिती चोरतो. डेटा चोरल्यानंतर, तुमच्या त्याच वैयक्तिक माहितीला सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं आणि तुमच्याकडून पैसे वसूल केले जातात. महाराष्ट्र सायबर सेलला अशा काही तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचं कळतंय. महाराष्ट्र सायबर सेलचे एसपी सचिन पांडकर यांनी एबीपी माझा दिलेल्या माहितीनुसार ‘महाराष्ट्र सायबर सेलच्या टेक्निकल टीमच्या संशोधन पथकाला असे चित्रपट, वेबसाइट्स, टीव्ही शोची नावे सापडली, ज्यांच्या नावाचा वापर करुन पायरेटेड वेबसाइटवर लोकांची फसवणूक केली जात आहे’ सायबर सेल ने 10 लोकप्रिय वेब मालिका आणि 10 चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे, जी भारतात सर्वांत जास्त पाहिली जात आहेत किंवा बेकायदेशीरपणे पाहण्यासाठी इंटरनेटवर सर्च केल्या जात आहेत. या लोकप्रियतेमुळे या चित्रपटांची व वेब सीरिजची नावे वापरुन सायबर फ्रॉड लोकांची फसवणूक करीत आहे. टॉप 10 वेब सीरीज ज्यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक होत आहे.
  • DELHI CRIME
  • BROOKLYAN NINE-nine
  • PANCHAYAT
  • AKOORI
  • FAUDA
  • GHOUL
  • MINDHUNTER
  • NARCOS
  • DEVLOK
  • LOST
  टॉप 10 चित्रपट, ज्यांच्या नावाचा वापर करुन फसवणूक होत आहे.
  • MARDANI 2
  • ZOOTOPIA
  • JAWANI JANEMAN
  • CHHAPAK
  • LOVE AAJ KAL
  • INCEPTION BAHUBALI
  • RAJNIGANDHA
  • GULLY BOY
  • BALA
आता ही फसवणूक कशी टाळायची?
  • तुम्ही एखादा चित्रपट, वेब मालिका अज्ञात वेबसाइटवर पाहण्याचा प्रयत्न करत असाल तर चित्रपट सुरू होण्यापूर्वी हॅकर एक प्रोग्रॅम चालवतातस हा प्रोग्राम चालवण्यास तुम्ही जर परवानगी दिली तर तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. म्हणूनच तुम्ही अशा वेबसाइटवर कोणताही प्रोग्रॅम चालवू नये.
  • मूळ वेबसाइटवर फिल्म किंवा वेबसीरीज पाहा
  • विनामूल्य चित्रपट पाहण्यासाठी कोणत्याही वेबसाइटला भेट देऊ नका.
  • आपला डेटा सुरक्षित करण्यासाठी नेहमी अँटी व्हायरसचा वापर करा.
  • सायबर फसवणूक, डेटा चोरीला गेल्यास त्वरित पोलिसांना कळवा.
Mission Begin Again 2 | महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत मिशन बिगिन अगेनचा दुसरा टप्पा,पूर्वीचेच नियम कायम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 01 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सKishor Darade Graduate Election : पदवीधर, शिक्षक मतदार निवडणुकीचा आज निकाल मतमोजणीला सुरुवातLonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 30 टेबलवर मतमोजणीला सुरुवात, चौरंगी लढतीत कोण मारणार बाजी?
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Maharashtra Accident: यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
यवतमाळ-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, इनोव्हा कार ट्रकला धडकली, चार जणांचा जागीच मृत्यू
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Embed widget