एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिक्षण संस्थेचा अडथळा
मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी महापौर बंगल्यासाठी असलेल्या शिक्षण संस्थेचा अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित संस्थेने स्मारकासाठी ही जागा देण्यासाठी नकार दिल्याने अडचण निर्माण झाली आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या बंगल्याची जागा देण्यात आली आहे. याबाबतचं विधेयकही राज्य सरकारने मंजूर केलं आहे.
सध्या महापौर बंगल्याशेजारीच असणाऱ्या केरळीया महिला समाज या संस्थेच्या ताब्यात 81 फुटांची जागा आहे. ही जागा महापालिकेने भाडे तत्वावर दिली होती. या जागेचा भाडे करार 2016 मध्येच संपला.
आता महापौर बंगल्याचाच एक भाग असलेली ही जागा महापौर बंगल्याच्या जागेसोबतच बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी वापरली जाणार आहे. मात्र ही जागा महापालिकेला परत देण्यास संबंधीत संस्थेने नकार दिला आहे.
या संस्थेत 15 ते 20 विद्यार्थ्यांचे नर्सरीचे वर्ग चालतात. मात्र ही जागा लवकरात लवकर परत घेतली जाईल, असं महापालिका प्रशासनाने सांगितलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement