एक्स्प्लोर

Omicron Variant : दिलासादायक! फायझर लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 प्रभावी, संशोधनात उघड

Omicron Variant : फायझर (Pfizer) कोविड लसीचा (Covid Vaccination) तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस (Booster Dose) कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 टक्के प्रभावी असल्याचं एका संशोधनात उघड झाले आहे.

Omicron Variant :  फायझर (Pfizer) कोविड लसीचा (Covid Vaccination) तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस (Booster Dose) कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटवर (Omicron Variant) 90 टक्के प्रभावी असल्याचं एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होईल, असे इस्त्रायलमध्ये केलेल्या रिसर्चमध्ये समोर आले आहे. 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते.

संशोधनात सहभागी 8,43,208 लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता, तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली.

क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस आणि इस्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझरच्या कोविड लसीचा बूस्टर (तिसरा) डोस कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.

जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरु आहे. त्याच वेळी, कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या 26 कोटी 93 लाख 21 हजार 866 च्या पुढे गेली आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 53 लाख 10 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
Plane Crash In America: अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget