एक्स्प्लोर

मुंबईत वीजपुरवठा खंडीत करण्यामागे घातपात नाही; आयआयटी मुंबईच्या अहवालातून स्पष्ट

मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणी तीन समित्या स्थापन झाल्या असून त्यातील एका समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. याप्रकरणात तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचं त्यातून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाला होता. यासंदर्भातील अहवाल समोर आला असून तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचं त्यातून स्पष्ट करण्यात आलं आहे. आयआयटी मुंबईचे विद्यतु अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात कोणताही घातपात किंवा सायबर हल्ल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मात्र वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. महापारेषणच्या कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1ची देखभाल-दुरुस्ती सुरु असताना सर्व भार सर्किट 2वर होता. मात्र सर्किट 2मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा 12 ऑक्टोबर रोजी खंडित झाला होता. बाहेरून येणारा वीज पुरवठा खंडित झाल्यावर मुंबईला पुरवण्यात येणारा अतिरिक्त वीज पुरवठ्याची आयलँडिंग सुविधा नीट ठेवणे आवश्यक होते. मात्र ती नीट नव्हती. अशी परिस्थिती उदभवणे हेच अनपेक्षित होते. त्यामुळे अशा परिस्थिती जी जलद प्रक्रिया व्हायला हवी होती, ती झाली नसल्याचेही अहवालात म्हटलं आहे. अचानक उदभवलेल्या परिस्थितीला तोंड द्यायला यंत्रणा कमी पडल्याचेही या चौकशी समितीचं म्हणणं आहे.

मुंबईतील वीज पुरवठा खंडित प्रकरणी तीन समित्या स्थापन झाल्या असून त्यातील एका समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, व्यवस्थेकडून त्वरित अॅक्शन व्हायला उशीर झाला असल्यामुळे एकाच वेळी संपूर्ण मुंबई आणि उपनगरांतील लाईट गेली होती.

मुंबई आणि परिसरामध्ये दि. 12 ऑक्टोबर रोजी झालेल्या वीजपुरवठा खंडित घटनेची चौकशी तसेच तांत्रिक लेखापरिक्षण करुन उपाययोजना सुचविण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रात तसेच उपनगरीय रेल्वेचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा वीज पुरवठा खंडीत होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत व अशा घटना भविष्यात होऊ नये याकरिता कोणत्या उपाय योजना राबविणे आवश्यक आहे. याचा सर्वंकष अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या समितीमधील सर्व सदस्य हे वीज क्षेत्राशी निगडित असून काही सदस्य विद्युत अभियांत्रिकी अध्ययन क्षेत्रातील तर काही सदस्य प्रत्यक्ष कामाशी संबधित असलेले आहेत.

या घटनेतील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांची चौकशी आणि तांत्रिक लेखापरीक्षण करणे, ग्रीड बंद पडण्यामुळे वीजनिर्मिती केंद्रे, वीजेची रिसिव्हींग स्टेशन्स, इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर्स, बस, वीजवाहिन्या बंद पडण्यामागील घटनाक्रम आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झालेले प्रयत्न, टाटा पॉवर कंपनी लि. चे आयलँडिंग सुरु न होऊ शकल्याची कारणे, 400 केव्ही लाईनवर मुंबईतील वीजेच्या आवश्यकतेनुसार आऊटेज घेण्याची कारणमिमांसा आणि त्याकरिता अवलंबलेली कार्यपद्धती; घटनेच्या वेळचा कळवा येथील राज्यभार वितरण केंद्राचा प्रतिसाद आणि अवलंबलेली कार्यपद्धती, घटनेच्या अनुषंगाने एसएलडीसी आणि अन्य यंत्रणांमधील समन्वय साधला गेला होता का? तसेच एसएलडीसीच्या वर्तमान कार्यपद्धतीमध्ये सुधारणा सुचविणे, भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचविणे आदींच्या अनुषंगाने या समितीकडून काम होणे अपेक्षित होतं.

समितीमध्ये नागपूर व्ही.एन.आय.टी. मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. एम. व्ही. आवारे, व्हि.जे.टी.आय., मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. फारुख काझी, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ सूत्रधार कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे, आयआयटी मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्रा. एस. ए. सोमण सदस्य तर महावितरणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण हे सदस्य सचिव असणार आहेत. आयआयटी पवईतील विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक अनिल कुलकर्णी हे या समितीचे निमंत्रित सदस्य आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Hitendra Thakur : वसईवाल्यांना तिथेच निपटावू, फडणवीसांचा हितेंद्र ठाकूरांना इशाराJaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शनABP Majha Headlines : 11 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VIDEO : वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
वसईवाल्यांना वसईतच ठेवू, डहाणूपर्यंत येऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; तर हितेंद्र ठाकुरांचाही पलटवार
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीनं लखनौच्या नवाबांचा खेळ बिघडवला, राजस्थानच्या रजवाड्यांना फायदा! 2 जागा, 3 संघ, कुणाला मिळणार प्लेऑफचं तिकिट?
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
दिल्लीचा शेवट गोड, लखनौचा 19 धावांनी पराभव, अर्शदची एकाकी झुंज
Prakash Ambedkar : ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
ठाकरेंचा शिंदेंशी समझोता, म्हणूनच कल्याण लोकसभेत नूरा कुस्ती; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
व्हिएतनाममध्ये भारतीय खेळाडूंचा डंका; रूपा बायोरने मिळवून दिले पहिले ऐतिहासिक पदक  
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
Embed widget