एक्स्प्लोर
मध्य रेल्वेवासियांची निराशा, एसी लोकलचं स्वप्न अपूर्ण
मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेवर एसी लोकल धावण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं आहे. एसी लोकलसाठी मध्य रेल्वेमार्ग सक्षम नसल्याचं मध्य रेल्वेनं एका पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.
सध्याच्या लोकलपेक्षा एसी लोकलची उंची जास्त आहे. मात्र कुर्ला ते सीएसटीच्या दरम्यान पुलांची उंची कमी आहे. त्यामुळे ही लोकल धावू शकत नसल्याचं मध्य रेल्वेनं सांगितलं. तसंच पश्चिम रेल्वेनं ही लोकल चालवावी असंही मध्य रेल्वेनं सुचवलं आहे.
कर्जत ते खोपोलीदरम्यान एसी लोकलची होणारी चाचणीही होऊ शकली नाही. एसी लोकलसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमध्ये चढाओढ सुरु होती. चेन्नईच्या कारखान्यातून 5 एप्रिलला ही लोकल मुंबईत दाखल झाली होती. 54 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल सहा महिन्यांपूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली.
या एसी लोकलसाठी आवश्यक असलेले काही बदल करण्यात आले होते. त्यानंतर मध्य रेल्वेवर लोकलचा ट्रायल रन सुरु होणार होता. उन्हाळ्यात गारेगार प्रवासाची स्वप्नं पाहणाऱ्या मध्य रेल्वेवरील मुंबईकरांच्या आशा धुळीला मिळल्या आहेत. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावर तरी ही एसी लोकल धावेल का, हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement