NIA Raids : NIA कडून मुंबईत 20 ठिकाणी छापे; दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधितांवर कारवाई
NIA Raids in Mumbai : NIA कडून मुंबईत 20 ठिकाणी छापे पडले आहेत. दाऊदच्या निकटवर्तीयांशी संबंधितांवर कारवाई केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
NIA Raids in Mumbai : केंद्रीय तपास यंत्रणा NIA नं डी कंपनीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मुंबईत 20 ठिकाणी एनआयएनं छापेमारी करण्यात आली आहे. दाऊदशी संबंधित अनेक जणांवर एनआयएचे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात छापे टाकले आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर कारवाई करत दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मित्रांच्या 20 हून अधिक ठिकाणांवर एनआयएकडून छापे टाकले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 ठिकाणांमध्ये शार्प शूटर, तस्करांचा हात आहे. याशिवाय अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत. असं सांगण्यात येतंय की, मुंबईत एनआयएची कारवाई सुरु आहे. मुंबईच्या नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजारात छापेमारी सुरु झाली आहे. दाऊदशी संबंधित अनेक हस्तक, ड्रग स्मगलर आणि असे अनेक लोक आहेत.
NIA नं दिलेल्या माहितीनुसार, भारतात अनेक ठिकाणी छोटा शकील, जावेद चिकना, इकबाल मिर्ची आणि इतर लोकांसोबत दाऊदनं आपलं नेटवर्क उभं केलं होतं. हे लोक व्यावसायिकांना टार्गेट करायचे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती यापूर्वी आम्हाला मिळाली होती. त्यावरुनच कारवाई करण्यात आली आहे.
ISI नं दाऊदची घेतली होती मदत
पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI नं आपल्या टोळीचा वापर करून मुंबईत दहशत निर्माण केली आणि त्या बदल्यात दाऊदला कराचीत आश्रय दिला. 12 मार्च 1993 ही काळी तारीख मुंबई कधीच विसरू शकत नाही. एकापाठोपाठ एक 13 बॉम्बस्फोटांनी शहर हादरलं. 257 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 750 लोक जखमी झाले होते. दरम्यान, दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानात लपला असल्याची माहिती आहे. दाऊद कराचीच्या पॉश भागात राहतो आणि दररोज स्वतःचा ठावठिकाणा बदलतो, असं सांगितलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :