(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded : कुख्यात गुन्हेगार रिंदाच्या दहशतीत नांदेडातील व्यावसायिक; अनेकांनी उद्योग गुंडाळून काढला पळ
Nanded Crime : नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, क्लासेस चालक, उद्योजक, आडत व्यापारी, डॉक्टर यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे.
Nanded Crime : आज एक महिन्या पूर्वी नांदेडातील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, क्लासेस चालक, उद्योजक, आडत व्यापारी, डॉक्टर यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण आहे. तर आज या घटनेला एक महिना तीन दिवस उलटूनही पोलिसांना मारेकऱ्यांचा अद्याप सुगावा लागलेला नाही. तसेच संजय बियाणी हत्येप्रकरणी गठित केलेल्या एसआयटीच्या तीन पथकांच्या हाती ही धुपाटणेच आले आहे. त्यामुळे संजय बियाणी हत्या प्रकरणात पुढे काय होईल?या विषयी मराठवाड्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान संजय बियाणी हत्येप्रकरणी हरविंदरसिंग रिंदा या गुन्हेगाराचे नाव समोर आले होते. कारण संजय बियाणी यांच्या हत्येअगोदर एक वर्षापूर्वी त्यांना दोन कोटींच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी रिंदाने दिली होती. त्यानंतर अनेक वर्षानंतर रिंदा हे नाव चर्चेत आले होते. तर संजय बियाणी यांच्या हत्येनंतर रिंदाच्या नावाने अनेक व्यावसायिकांना धमकी पत्र व थ्रेड कॉल येणे सुरू झाले होते. तर खुद्द नांदेड जिल्ह्याचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनाही रिंदाने खंडणी व जीवे मारण्याचे धमकीचे पत्र समोर आले आहे.
त्यानतंर पोलिस प्रशासनाने कोम्बिंग ऑपरेशन करत आतापर्यंत 65 गुन्हेगारांना गजाआड केले आहे. तर या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 35गावठी पिस्तुल, एअर गन, तलवारी,खंजर व तब्बल 25 तलवारीचा मोठा साठा पोलिसांनी आतापर्यंत हस्तगत केलाय. तर रिंदा व बिगाणीया टोळीच्या सदस्यांची धरपकड करत असताना त्यांनी पोलिसांवर प्राण घातक हल्लेही केलेत. त्यामुळे बियाणी हत्येनंतर नांदेड जिल्ह्यात दिवसागणिक चालू असलेल्या हत्या, खंडणी, लुटमार, जीवघेणे हल्ले, गोळीबार व अवैध हत्यारे मिळण्याच्या गुन्हेगारी वातावरणामुळे भेदरलेल्या व्यावसायिक ,उद्योजक, डॉक्टर, क्लासेस चालक यांनी येथील गुंतवणूक थांबवून इथून पळ काढला आहे.
नांदेडातील गुन्हेगारी वातावरणामुळे आधीच भयभीत झालेले हे उद्योजक ,व्यावसायिक, व्यापारी, डॉक्टर यांनी आता नांदेडातून काढता पाय घेतलाय. तर त्यातच भर अशी की हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर पकडलेल्या चार अतिरेक्यांचा मोरक्या हरविंदर रिंदा असल्याचे समोर आलेय. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर हे दहशतीमुळे कमालीचे वैफल्यग्रस्त झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे येथील काही व्यावसायिकांनी पोलिसांचे संरक्षण घेतलंय तर येथील सहा मोठे उद्योजक व व्यावसायिक यांनी जिवाच्या भीतीने येथील उद्योग गुंडाळून पुणे, मुंबई, हैद्राबाद येथे जीव मुठीत घेऊन पळ काढला असल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या पत्नीने दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nanded : हरविंदरसिंग रिंदाच्या साथीदारांच्या घरी आणि शेतात पोलिसांचे धाडसत्र
Khalistani Terrorist Harvinder Singh Rinda : खलिस्तानी दहशतवादी रिंदानंच तेलंगणामध्ये RDX पाठवलं