एक्स्प्लोर

शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन देण्यास एनआयए कोर्टाचा नकार

नवलखा नजरकैदेतून पुन्हा एनआयएच्या ताब्यात, 10 दिवसांसाठी एनआयए कोठडीत रवानगी.कोरोनामुळे तेलतुंबडे आणि नवलखा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएला 90 दिवसांची मुदतवाढ.वरवरा राव यांची जामीनासाठी हायकोर्टात याचिका.

मुंबई : शहरी नक्षलवाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं फेटाळून लावत राष्ट्रीय तपास यंत्रणेला पुढील चौकशीसाठी नवलखा यांची आणखी 10 दिवसांची कोठडीही मंजूर केली.

या खटल्यातील आरोपी व मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएकडून आणखी 90 दिवसांची मुदतवाढ मागण्यात आली आहे. कोरोनाचा वाढत्या प्रार्दुभावामुळे खटल्याबाबत अधिक तपास करता आला नाही. अटकेपासून 90 दिवसांच्या कालावधीत एनआयए आरोपपत्र दाखल करण्यास अपयशी ठरल्यामुळे जामीनासाठी नवलखा यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता. या अर्जांवर एनआयए विशेष न्यायालयात एकत्रितपणे सुनावणी पार पडली.

एनआयएला का मिळाली 90 दिवसांची मुदतवाढ बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (युएपीए) गुन्हांची नोंद केली असल्याने तपासयंत्रणेला चौकशी आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो. मात्र, 90 दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर वाढीव 90 दिवसांच्या अवधीसाठी तपास यंत्रणेला तपासातील प्रगती अहवाल द्यावा लागतो. दुसरीकडे नवलखा यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आलेला कालावधी 90 दिवसांच्या मुदतीतही गणण्यात यावा असा युक्तिवाद नवलखा यांच्यावतीने करण्यात आला होता. मात्र, घरात नजरकैद असतानाचा कालावधी अटकेच्या कालावधीत समाविष्ट करता येणार नाही; तसेच नजर कैदेदरम्यान नवलखा यांना कधीही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले नव्हते, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावत 22 जुलैपर्यंत तळोजा कारागृहात नवलखा यांचा ताबा एनआयएकडे सोपविण्याचे निर्देश दिले. तेलतुंबडे आणि नवलखा यांच्याविरोधात चौकशी आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएला 90 दिवसांची मुदतवाढ देत सुनावणी तहकूब केली.

कोरोना पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव प्रकरणातील सुधा भारद्वाज यांचा जामीनासाठी अर्ज

वरवरा राव यांची हायकोर्टात धाव तर दुसरीकडे एल्गार परिषद आणि भीमा-कोरेगाव इथं उसळलेल्या हिसांचार प्रकरणी अटकेत असलेले लेखक, कवी वरवरा राव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली असून त्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी राव यांनी या याचिकेतून केली आहे.

31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाड्याजवळ एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी, 2018 रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणांमुळे हा हिंसाचार उसळल्याचा तसेच एल्गार परिषदेला माओवाद्यांकडून अर्थपुरवठा झाला आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांचा माओवाद्यांशी थेट संबंध आहे, असा पोलिसांचा आरोप आहे.

राव हे सध्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात आहेत. तळोजा कारागृहात प्रकृती खालावत चालली असल्याचे राव यांनी स्वतःहून फोनद्वारे आपल्या नातेवाईक आणि वकिलांना सांगितल्यानंतर त्यांच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली. जेजे रुग्णालय प्रशासनाने सुचविल्याप्रमाणे कारागृह प्रशासन राव यांच्यावर योग्य ते उपचार करत नसल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. कारागृहातील ज्या अधिकाऱ्यांनी हा गलथानपणा केला त्यांच्यावर कारवाई करावी, राव यांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून त्यांना उपचारांसाठी खासगी तातडीनं रुग्णालयात दखल करावं अशी मागणीही याचिकेमार्फत करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

Bogus Soybean Seeds | बोगस बियाणे प्रकरण | डॉ. जाधव 13 जुलैला हजर न राहिल्यास त्यांना अटकेचे आदेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget