Sharad Pawar Health : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया; राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
Sharad Pawar Health : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना 30 मार्चला पोटात दुखत असल्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 7 दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. आज पुन्हा त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पित्ताशयावर आज यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. यासाठी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले होते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना 30 मार्चला पोटात दुखत असल्यामुळे ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 7 दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता. त्यानंतर 15 दिवसांनी आज त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे शरद पवारांना रविवारी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
3 एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यावेळी त्यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. शरद पवारांवर एक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 30 मार्च रोजी पित्ताशयामध्ये (Gallbladder) अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला. एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली होती. या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे. दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती.
शरद पवारांच्या पित्तनलिकेच्या मुखाशी एक मोठा खडा अडकून बसला होता. ज्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे तत्काळ शस्त्रक्रिया करणं योग्य नव्हतं. त्यामुळे लगेच काही चाचण्या केल्यानंतर पित्तशयातील तो खडा दुर्बिणीद्वारे काढण्यात आला. या शस्त्रक्रियेला अर्धा तास लागला, अशी माहिती डॉक्टर मायदेव यांनी दिली होती. दरम्यान, या शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या यकृतावरील ताण कमी होणार आहे. त्याचसोबत त्यांना थोडी काविळ देखील झाली होती, ती देखील कमी होण्यास मदत होईल, असं देखील मायदेव यांनी सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :