एक्स्प्लोर

राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज, शस्रक्रियेमुळे 6 आठवडे घ्यावा लागणार काठीचा आधार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शनिवारी लिलावती रुग्णालयात एक छोटी शस्रक्रिया पार पडली. शस्रक्रियेनंतर आज त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर काल (शनिवार) लिलावती रुग्णालयात एक छोटी शस्रक्रिया पार पडली. शस्रक्रियेनंतर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी राज ठाकरेंना सहा आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे. पायाच्या मसल टिशूमध्ये रक्त जमा झालं होतं. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया केली गेली.

दरम्यान, शस्रक्रियेनंतर चालताना त्यांना काठीचा आधार घेत चालावं लागणार आहे. पायावरील ताण कमी व्हावा तसेच चालताना त्रास कमी व्हावा म्हणून त्यांना काठी देण्यात आली आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते थेट दादरच्या त्यांच्या निवासस्थानासमोरील अमित ठाकरेंच्या घरी विश्रांतीसाठी गेले आहेत.

राज ठाकरे यांच्या हाताला 11 जानेवारी 2021 रोजी फॅक्चर झालं होतं. टेनिस खेळताना त्यांना ही दुखापत झाली होती. ज्यात त्यांच्या हातासोबतच पायाला देखील दुखापत झाली होती.  त्यामुळे त्यांना बसण्याचा त्रास जाणवत होता. तसेच प्रवास करताना देखील त्यांना अधिक त्रास जाणवू लागला होता. काल (10 एप्रिल) दुपारी 3 च्या सुमारास त्यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. विनोद अग्रवाल, डॉ. आनंद उत्तुरे यांनी शस्त्रक्रिया केली आणि डॉ. जलील पारकर शस्रक्रियेदरम्यान उपस्थित होते.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशातच वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. "राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहकार्य करावं", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना फोनवरील संवादात केलं होतं.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget