एक्स्प्लोर

'पैसे उकळण्यासाठीचं राज्य सरकारच्या केसेस NCB स्वतःच्या ताब्यात घेत आहे', नवाब मलिक यांचा केंद्राला टोला

एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील 5 महत्त्वाच्या केसेस अमित शाह यांच्या आदेशानुसार एनसीबी आपल्या ताब्यात घेत आहे.

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा एनसीबी विरुद्ध एनसीपी (NCB vs NCP) असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण राज्य सरकारच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईतील 5 महत्त्वाच्या केसेस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amir Shah) यांच्या आदेशानुसार एनसीबी आपल्या ताब्यात घेणार आहेत. तसं पत्र एनसीबीच्या महासंचालकांनी यांनी राज्याच्या महासंचालकांना लिहिले आहे. यामध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशाने 'आपण तात्काळ नमूद केलेल्या 5 केसेस एनसीबीकडे वर्ग कराव्यात' असं लिहिण्यात आलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी प्रतिक्रिया दिली देत केंद्रावर निशाणा साधला आहे.
 
संबधित सर्व प्रकरणावर बोलताना नवाब मलिकांनी काही प्रश्न विचारले आहेत. एनसीबीच्या महासंचालकांनी एक पत्र 24 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महासंचालकांना लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी उल्लेख केला होता की, अमित शाह यांच्या आदेशानुसार राज्याच्या अँटीनार्कोटिक्स सेलने ज्या 5 महत्त्वाच्या टॉप केसेस केलेल्या आहेत. त्या एनसीबीला तात्काळ हस्तांतरीत करण्यात याव्यात. एनसीबीच्या महासंचालकांच्या पत्राच्या अनुषंगाने अमित शाह यांना सवाल विचारताना मलिक म्हणाले, 'त्यांनी एनसीबीला दिलेल्या आदेशात ज्या पाच केसेस नमूद केल्या आहेत. त्या केसेसचे निकष काय आहेत. एनसीबीने कारवाई केलेल्या छोट्या केसेस की राज्याच्या युनिटने हस्तगत केलेल्या 3 टन ड्रग्जसारख्या मोठ्या केसेस आहेत, हे असं बोलत मलिकांनी एनसीबीसह केंद्र सरकारला टोला दिला आहे. एनसीबीपेक्षा अधिक काम राज्याच्या अँन्टी नार्कोटिक्स विभागाने केलं आहे. संबधित पाच केसेसच्या माध्यमातून एनसीबीचा पैसे उकळण्याचा धंदा सुरु आहे, असाही आरोप मलिकांनी केला आहे.
 
केंद्राने उत्तर द्यावं
 
मलिकांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'एनसीबी खरंच काम करत असेल तर जी 26 बोगस केसेसची प्रकरणे तुम्हाला पाठवली आहेत याची चौकशी करा. हे आता स्पष्ट झालं आहे की, महाराष्ट्रातील एनसीबीच्या युनिटच्या माध्यमातून पैसे उकळण्याचं काम सुरु आहे. त्यांनी आपली प्रायव्हेट आर्मी देखील सुरु केली आहे. त्यामुळे या केसेस त्यांच्याकडे कशाला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले आहेत याचं उत्तर केंद्र सरकारने द्यावं.'
 
महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Sonu Sood on Chhath Puja: छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
छटपूजेवरुन मुंबईतलं वातावरण तापलं, मनसे आक्रमक, पण जुहूतील छटपूजा उत्सवाला सोनू सूद येणार, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
NCP Merger Aditi Tatkare: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग, अदिती तटकरेंनी नंदूरबार दौऱ्यात अचानक बदल, अर्ध्यातूनच मुंबईला परतणार
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या हालचालींना वेग, अदिती तटकरेंनी नंदूरबार दौऱ्यात अचानक बदल, अर्ध्यातूनच मुंबईला परतणार

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Patil on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Embed widget