एक्स्प्लोर

नारायण राणेंचा भाजप प्रवेश 27 ऑगस्टला?

27 ऑगस्टला अमित शहांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना ऊत आला आहे. मात्र, ही अटकळ आता लवकरच खरी ठरणार असल्याची शक्यता 'माझा'च्या सूत्रांकडून समजते आहे. 27 ऑगस्टला अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जाती आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसी वातावरणाला कंटाळलेल्या आणि नितेश तसंच निलेश राणेंच्या राजकीय भवितव्याची तरतूद म्हणून राणेंसाठी भाजप हाच सर्वोत्तम पर्याय असल्याचं सध्या बोललं जात आहे. अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यावेळीच राणेंचा पक्षप्रवेश होणार? सुत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणेंचा पक्षप्रवेश लांबला आहे. त्यामुळे येत्या 27 ऑगस्टला अमित शाह यांच्या उपस्थितीत राणेंचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच राणेंचा पक्षप्रवेश लांबण्याची इतरही काही कारणं होती. राणे भाजपमध्ये आल्यास त्याचा भाजपला किती फायदा होईल याचीही चाचपणी भाजपकडून गेले काही दिवस सुरु होती. म्हणून आशिष शेलारांचा दिल्ली दौरा? दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी आशिष शेलार दिल्लीत गेले होते त्यामागे राणेंचा भाजप प्रवेश हेच प्रमुख कारण असल्याचं समजतं आहे. राणेंमुळे भाजपला कोकणात काय फायदा होईल याचीही चर्चा शाहा आणि शेलार यांच्यात चर्चा झाल्याचं समजतं आहे. नारायण राणे केंद्रात जाणार? दुसरीकडे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की. भाजप प्रवेशानंतर नारायण राणे यांना राज्यसभेत जाण्याची इच्छा आहे. त्यामुळे राणेंना आता राज्यातील नव्हे तर केंद्रातील राजकारणात रस असल्याचं म्हटलं जात आहे. राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे : चंद्रकांत पाटील दरम्यान, कालच (शुक्रवार) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नारायण राणे भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच आहे.’ असं सूचक वक्तव्य केलं होतं. नारायण राणे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवस सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. नारायण राणेंची अहमदाबादवारी  काही दिवसांपूर्वीच नारायण राणेंची अहमदाबादमध्ये अमित शाह यांची भेट झाली होती. तेव्हा राणेंच्या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चाही झाली होती. मात्र, आपण अमित शाह यांना भेटलोच नसल्याचं त्यावेळी राणेंनी म्हटलं होतं. संबंधित बातम्या :

गडकरींवर स्तुतिसुमनं, नारायण राणे भाजपच्या वाटेवर?

अहमदाबादमध्ये अमित शाह-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा, राणेही अहमदाबादमध्येच? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget