एक्स्प्लोर
'सामना'त रिफायनरीची जाहिरात छापल्याने नाणारवासीय आक्रमक
सामना वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीबद्दल खुलासा मागण्यासाठी नाणारवासीय सामनाच्या कार्यालयात दाखल झाले. कोकण रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामनाच्या कार्यालयात धडक मारली. सरकारची आणि शिवसेनेची नाणारविषयीची भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
!['सामना'त रिफायनरीची जाहिरात छापल्याने नाणारवासीय आक्रमक nanar villager angry on samana newspaper 'सामना'त रिफायनरीची जाहिरात छापल्याने नाणारवासीय आक्रमक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/16011618/samna.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई - नाणार प्रकल्प रद्द केलेला असताना सामना या वृत्तपत्रातून रत्नागिरी आवृत्तीमध्ये नाणारची जाहिरात छापल्याने नाणारवासीय सामना वृत्तपत्रावर नाराज झालेले आहेत. अशा पद्धतीची जाहिरात का छापली याचा खुलासा मागण्यासाठी नाणारवासीय आज सामनाच्या कार्यालयावर येऊन धडकले. त्यानी सामनाचे संपादक संजय राऊत यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. सामानाने या जाहिरातीचा खुलासा त्वरित छापावा अशी मागणी नाणारवासी यांनी केलेली आहे. जर हा खुलासा छापला नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.
सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊस कोकणवासियांच्या उन्नतीसाठी अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्प रद्द केल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यानंतर देखील आता सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी सामनामध्ये जाहीरात देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारला जात आहे.
'सामना'त रिफायनरीची जाहिरात, कोकणातील राजकारण पुन्हा तापलं
शिवसेनेची नेमकी भूमिका काय?
आम्ही स्थानिकांसोबत असा दावा कायम शिवसेनेकडून केला जात आहे. पण, शिवसेनेचा उघडपणे होत असलेला विरोध काही प्रमाणात मावळताना होताना दिसत आहे. शिवाय, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील नाणारसाठी आग्रही दिसून येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल केला जात आहे.
काय म्हणाले विनायक राऊत
नाणारला आमचा विरोध कायम आहे. सामना हे जरी शिवसेनेचं मुखपत्र असलं तरी ते वृत्तपत्र आहे. इतर वृत्तपत्रांतील जाहिरातींप्रमाणे सामनामध्ये देखील जाहिरात आली. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलता दिली.
फडणवीसांचं ते विधान
लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना-भाजपनं एकत्र येत नाणार रद्द करत असल्याचं सांगितलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील जमिन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द केली होती. पण, राजापूर येथे आले असता तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाणार समर्थनाची भूमिका असल्याचं विधान केलं होतं.
सामना रिफायनरी जाहिरत | वृत्तपत्रांमधील इतर जाहिरातींप्रमाणे ही जाहिरात असेल : विनायक राऊत | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)