एक्स्प्लोर

'सामना'त रिफायनरीची जाहिरात, कोकणातील राजकारण पुन्हा तापलं

सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊस कोकणवासियांच्या उन्नतीसाठी अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्प रद्द केल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यानंतर देखील आता सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात देण्यात आली आहे.

रत्नागिरी : नाणार प्रकल्प रद्द झाला असं शिवसेना सांगत असली तरी नाणार प्रकल्पावरून कोकणातलं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. त्याला कारणीभूत ठरलं आहे ते सामना वृत्तपत्रात आलेल नाणार समर्थनाची जाहीरात. सामनाच्या कोकण आवृत्तीमध्ये रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊस कोकणवासियांच्या उन्नतीसाठी अशी जाहिरात देण्यात आली आहे. त्यावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. नाणार प्रकल्प रद्द केल्याचं शिवसेनेनं सांगितलं आहे. त्यानंतर देखील आता सामनामध्ये रिफायनरीच्या समर्थनार्थ जाहीरात देण्यात आली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्याच वेळी सामनामध्ये जाहीरात देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल विचारला जात आहे. दरम्यान, नाणार व्हावा यासाठी आता भाजपसह शिवसेनेतील देखील काही कार्यकर्ते आणि नेते नाणार रिफायनरीच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नाणार पुन्हा येणार की कायमचा हद्दपार होणार हे पाहावं लागणार आहे.

काय म्हणाले विनायक राऊत नाणारला आमचा विरोध कायम आहे. सामना हे जरी शिवसेनेचं मुखपत्र असलं तरी ते वृत्तपत्र आहे. इतर वृत्तपत्रांतील जाहिरातींप्रमाणे सामनामध्ये देखील जाहिरात आली. अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताा दिली.

शिवसेना नेते कार्यकर्ते आग्रही आम्ही लोकांसोबत आहोत. त्यामुळे नाणार कोणत्याही परिस्थितीत होणार नाही अशी भूमिका शिवसेना अर्थात उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्यानंतर नाणार रद्द झाल्याची अधिसुचना देखील काढली गेली. पण, आता काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते हे नाणार व्हावा यासाठी आग्रही झाले आहेत. कोकणात सध्या भातशेती, आंबा, काजू वातावरणामुळे चांगलं उत्पादन आता देत नाहीत. शिवाय, कोकणातील तरूण हा मोठ्या प्रमाणावर गाव सोडून शहरांकडे वळतोय. उद्योगांअभावी कोकणचा विकास देखील रखडला आहे. नाणार, आंबोळगड, जैतापूरसारखे प्रकल्प आल्यास कोकणचा विकास होईल असं म्हणत आता नाणारचं समर्थक केलं जात आहे. यामध्ये शिवसेनेचे नेते देखील अग्रक्रमावर आहेत.

फडणवीसांचं ते विधान लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना - भाजपनं एकत्र येत नाणार रद्द करत असल्याचं सांगितलं होतं. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी देखील जमिन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द केली होती. पण, राजापूर येथे आले असता तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाणार समर्थनाची भूमिका असल्याचं विधान केलं होतं.

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? आम्ही स्थानिकांसोबत असा दावा कायम शिवसेनेकडून केला जात आहे. पण, शिवसेनेचा उघडपणे होत असलेला विरोध काही प्रमाणात मावळताना होताना दिसत आहे. शिवाय, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील नाणारसाठी आग्रही दिसून येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय? असा सवाल केला जात आहे.

संबंधित बातम्या : 

नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाणार प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने शिवसेना नाराज

रत्नागिरीत नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ मोर्चा, भाजपचा पाठिंबा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
संभाजीनगरमधील प्रसिद्ध हॉटेल FDA कडून सील; जिलेबीच्या गोडव्यात भेसळ, तुकाराम मुंढेंच्या विभागास काय आढळल्या त्रुटी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीला पूर; रामसेतू पाण्याखाली, पुराचे पाणी बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Anna Hazare Protest Ahilyanagar:  मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर
मौन धरणे आंदोलनादरम्यान अण्णा हजारेंना रडू कोसळलं, विद्यार्थ्यांच्या हातातील पोस्टर पाहताच अश्रू अनावर
Devendra Fadnavis On Raj Thackeray And Uddhav Thackeray Morcha: विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
विद्यार्थ्यांसाठी मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest: जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवरती आंदोलनावेळी शांत उभारलेल्या महिलेच्या कानाखाली मारली; व्हिडीओ व्हायरल झाला, ADCP ची पोस्टिंग केली थेट....
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
जंतरमंतरवर पोलिसांचा मार खात विद्यार्थ्यांचा न्यायासाठी संघर्ष सुरुच असतानाच आता संसदेच्या दारात खडाजंगी; खासदार आमनसामने, प्रियांका गांधी घोषणाबाजी करतच एनडीएच्या खासदारांकडे पोहोचल्या
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Embed widget