![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होतोय
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला आहे. शहरातला सर्वात मोठा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीतला डबलींग रेट तर 44 दिवसांवर गेला आहे.
![देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होतोय Mumbai's doubling rate increased to 24.5 days देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होतोय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/27001208/BMC.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. कारण, मुंबईचा डबलिंग रेट 24.5 दिवसांवर गेला आहे. तर देशाचा डबलींग रेट 16 दिवसांवर गेल्याची नोंद झाली आहे. पहिल्यापासूनच देशात सर्वाधिक कोरोना संसर्गाचा वेग मुंबईत पाहायला मिळला आहे. आजच्या घडीला मुंबईमध्ये 50 हजारांच्यावर कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे आवश्यक होते. यासाठी राज्य सरकार, महापालिका प्रशासन मेहनत घेत होते. याचाच परिणाम म्हणजे मुंबईत कोरोना रुग्ण डबल होण्याचा कालावधी वाढला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. विशेषतः ही बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची आहे. कारण, 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण असलेल्या मुंबईचा डबलिंग रेट 24.5 दिवसांवर गेला आहे.
मुंबईकरांसाठी महत्वाची माहिती
- मुंबईतला सर्वात मोठा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीतला डबलींग रेट तर 44 दिवसांवर गेला आहे. तर धारावीतील ग्रोथ रेट 1.57% आहे.
- मुंबईचा ग्रोथ रेट (रुग्णसंख्यावाढीचा दर) 20 दिवसांपूर्वी 6.61% होता जो आता 2.82% झालाय.
- मुंबईचा मृत्युदर राष्ट्रीय सरासरी एवढा म्हणजे 3% झाला आहे.
- मुंबईत डिस्चार्ज रेट (रुग्ण बरे होण्याचा दर ) 44% एवढा आहे...
- मुंबईत आता 5% च्या पुढे ग्रोथ रेट असणारे केवळ 2 विभाग उरलेत. या ठिकाणी रुग्णसंख्यावाढ रोखण्याचे आव्हान आहे.
- पी नॉर्थ - मालाड, मालवणी, दिंडोशी - 5.9% आहे.
- आर नॉर्थ - दहिसर - 5.7% आहे.
राज्यात आतापर्यंत 44 हजार 517 रुग्ण कोरोनामुक्त राज्यात आज 1879 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 44 हजार 517 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
देशात अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सध्याच्या अॅक्टिव्ह केसेसपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाचा प्रभाव देशभरात वाढत असताना पहिल्यांदा असं घटलं आहे. याचा अर्थ असा की देशभरातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट (कोरोनामुक्त होण्याचा) 50 टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या चिंताग्रस्त वातावरणात ही आकडेवारी सकारात्मक आहे.
मंदीत संधी! कमी गुंतवणूकीत डिझायनिंग शिलाईचा व्यवसाय घरच्याघरी शक्य! कमी खर्चात मिळवा मोठा नफा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)