कोरोनाबाबत 'पॉझिटिव्ह' न्यूज | देशात पहिल्यांदा अक्टिव्ह केसेस पेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त
देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा संख्या 2 लाख 76 हजार 583 झाली आहे. यामध्ये 1 लाख 33 हजार 632 रुग्णांवर सध्या उपचार (अॅक्टिव्ह केस) सुरु आहेत. तर एकूण 1 लाख 35 हजार 205 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे वाढत असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची बरे होण्याची संख्या सध्याच्या अॅक्टिव्ह केसेसपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाचा प्रभाव देशभरात वाढत असताना पहिल्यांदा असं घटलं आहे. याचा अर्थ असा की देशभरातील कोरोनाबाधितांचा रिकव्हरी रेट (कोरोनामुक्त होण्याचा) 50 टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या चिंताग्रस्त वातावरणात ही आकडेवारी सकारात्मक आहे.
देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 583 झाली आहे. यामध्ये 1 लाख 33 हजार 632 रुग्णांवर सध्या उपचार (अॅक्टिव्ह केस) सुरु आहेत. तर एकूण 7745 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे एकूण 1 लाख 35 हजार 205 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.
देशात सलग सहाव्या दिवशी 9500 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण
आज म्हणजे बुधवारी सकाळपर्यंत गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसच्या जवळपास 10 हजार रुग्णांची नोंद झाली आहे. सलग सहाव्या दिवशी देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9500 हून अधिक आहे. तर गेल्या 24 तासात एकूण 279 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगभरातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश
- अमेरिका : एकूण रुग्ण 2,045,549, एकूण मृत्यू 114,148
- ब्राझील : एकूण रुग्ण 742,084, एकूण मृत्यू 38,497
- रूस : एकूण रुग्ण 485,253, एकूण मृत्यू 6,142
- यूके : एकूण रुग्ण 289,140, एकूण मृत्यू 40,883
- स्पेन : एकूण रुग्ण 289,046, एकूण मृत्यू 27,136
- भारत : एकूण रुग्ण 276,146, एकूण मृत्यू 7,750
- इटली : एकूण रुग्ण 235,561, एकूण मृत्यू 34,043
- पेरू : एकूण रुग्ण 203,736, एकूण मृत्यू 5,738
- जर्मनी : एकूण रुग्ण 186,516, एकूण मृत्यू 8,831
- इराण : एकूण रुग्ण 175,927, एकूण मृत्यू 8,425