एक्स्प्लोर

Coronavirus in Mumbai : शाब्बास मुंबई! मागील 45 दिवसांत मुंबईत पहिल्यांदाच रुग्णसंख्या 2500हून कमी

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही अधिक धोका असणारी मुंबई प्रत्येक संकटावर मात करत नव्यानं श्वास घेतना दिसू लागली आहे.

Coronavirus in Mumbai : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही अधिक धोका असणारी मुंबई प्रत्येक संकटावर मात करत नव्यानं श्वास घेतना दिसू लागली आहे. तिची हीच उर्जा जणू रुग्णांनाही एक सकारात्मक उर्जाच देत आहे असं म्हणायला हरकत नाही. रविवारी मुंबईत एकूण 2403 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ज्यामुळं मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा  6,76,475 वर पोहोचला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती देण्यात आली. शनिवारी शहरात 2,678 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. 

18 मार्चला शहरानं 2877 नव्या कोरोनाबाधितांचा इतका कमी आकडा पाहिला होता. त्यानंतर सातत्यानं रुग्णसंख्येचा आलेख चढताच दिसून आला होता. सलग दुसऱ्या दिवशी 3 हजारहून कमी रुग्ण आढळण्याची ही मुंबईसाठीची दुसरी वेळ. तर, 2500 हून कमी रुग्ण आढळण्याची ही मागील 45 दिवसांतील पहिलीच वेळ.

Maharashtra Corona Cases : रविवारी राज्यात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी तर 48,401 नवीन रुग्णांचे निदान 

रविवारी शहरात 3375 रुग्णांनी या संसर्गावर मात केली. ज्यामुळं कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा 6,13,418 वर पोहोचला. तर, 68 जणांना मागील 24 तासांत मृत्यू झाल्याची माहितीही पालिकेनं दिली.आतापर्यंत मुंबईत 13,817 रुग्णांना कोरोनामुळं प्राण गमवावे लागले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण आता वाढलं असून, हा आकडा 91 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या शहरात 47,416 सक्रिय रुग्ण आहेत. तर, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी हा थेट 153 दिवसांवर पोहोचला आहे. 

आरोग्य यंत्रणांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, फ्रंटलाईन वर्कर्सचा हातभार, प्रशासनाची आखणी आणि अर्थात मुंबईकरांची साथ या साऱ्याच्या बळावर सध्या मुंबई या कठीण प्रसंगातही पाय घट्ट रोवून उभी आणि हा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर नेत आहे. त्यामुळं सध्या मुंबईकडे कोरोना संसर्ग नियंत्रणातील आदर्श शहर म्हणूनही पाहिलं जात आहे. शाब्बास मुंबई!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीकाDevendra Fadnavis : धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्यमुळे महायुतीचा उमेदवार गेला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
October Monthly Horoscope 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबर महिना कसा राहील? वाचा मासिक राशीभविष्य
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
सासूच्या मृत्यूची बातमी कळूनही हसत रहावे लागले.., कपील शर्मा शोमधील अर्चना सिंगनं सांगितली आठवण
Embed widget