एक्स्प्लोर

Maharashtra Corona Cases : रविवारी राज्यात 60,226 रुग्ण बरे होऊन घरी तर 48,401 नवीन रुग्णांचे निदान

Maharashtra Corona Cases :  रविवारी राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यभरात आज 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Corona Cases :  राज्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आज सलग दुसऱ्या दिवशी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात 48,401 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यभरात आज 60,226 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 44,07,818 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 86.4 % एवढे झाले आहे. काल 82,266 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता तर 53,605 नवीन रुग्णांचे निदान झाले होते.

राज्यात आज 572 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,94,38,797 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 51,01,737 (17.33टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 36,96,896 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 26,939 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,15,783 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला

राज्यातील अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या 15 तारखेला घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळं राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट अजून कमी होत नाही. दररोज 50 ते 60 हजारांच्या घरात रुग्ण संख्या येत आहे. त्यामुळं एक तृतीअंश राज्य हे उतरत्या वळणार असून उर्वरित भागावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती टोपे यांनी दिली.

अनेक जिल्ह्यांमध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळं काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे.  जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं देखील व्यक्त केलं होतं. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल आणि आरोग्य सुविधांशी संबंधित कामं वगळता सर्व गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळGulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Embed widget