एक्स्प्लोर
Advertisement
मुंबईत आता पार्किंगची जागा ऑनलाईन बूक करा!
मुंबई : मुंबईत पार्किंग करताना तुम्हाला नेहमीच अडचण येत असते, मात्र आता दक्षिण मुंबईत घरातून निघतानाच तुम्ही आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी पार्किंगची जागा बूक करू शकणार आहात.
मुंबई महानगरपालिकेने अॅपची तसंच ऑनलाईन पार्किंग बूक करण्याची व्यवस्था केली आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील आठ वाहनतळांवर ही सुविधा पुढच्या तीन महिन्यांत सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्या उपस्थितीत नुकतीच प्राथमिक तांत्रिक चाचणीही घेण्यात आली आहे.
पार्किंगची व्यवस्था कशी असेल?
- तुमचं वाहन कोणत्या वाहनतळावर पार्क करायचे याचा निर्णय वाहनधारकाला तिथे पोचण्यापूर्वीच घेता येईल.
- वेबसाइट किंवा अॅपवर बुकिंग केल्यानंतर वाहनधानकारला पत्ता, जागा क्रमांक, बुकिंगचा कालावधी, वाहनक्रमांक हे तपशील मोबाइलवर मेसेजद्वारे मिळतील. तोच मेसेज वाहनतळावर कार्यरत कर्मचाऱ्यालाही जाईल.
- अॅपद्वारे वाहनचालकाला वाहनतळापर्यंत पोचण्याचा मार्गही जीपीएसच्या सहाय्याने दिसू शकेल.
- वाहनतळावर पोचल्यानंतर उपस्थित कर्मचारी वाहन क्रमांकाची खातरजमा करून पार्किंगसाठी जागा करुन देतील.
- बुकिंग केल्यानंतर निर्धारित कालावधीत वाहन आलं नाही तर त्याचे ऑनलाइन बुकिंग रद्द होऊन ते अन्य वाहनासाठी मिळेल.
- बुकिंग केलेलं वाहन पार्किंगमधून बाहेर पडतानाही नोंद होईल आणि बुकिंग कालावधीपेक्षा अधिक काळ लाभ घेतला असल्यास अतिरिक्त शुल्क द्यावं लागेल.
- नेहमी येणाऱ्या वाहनधारकांसाठी ‘आरएफआयडी टॅग’ची सुविधा दिली जाईल. ज्याद्वारे संबंधित वाहन पार्किंगमध्ये पोचल्यावर आणि तिथून बाहेर पडताना पार्किंगचं गेट स्वयंचलित पद्धतीने उघडलं जाईल.
- वाहन जेवढा वेळ पार्किंमगमध्ये असेल तेवढ्या वेळाचे पैसे वाहनधारकाच्या खात्यातून पालिकेच्या अथवा कंत्राटदाराच्या खात्यात जमा होतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement