एक्स्प्लोर

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; ऐन उन्हाळ्यात पाणी कपातीची शक्यता, सातही धरणांमध्ये 37 टक्केच पाणीसाठा

Mumbai Water Cut News: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे.

Mumbai Water Cut News: ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईवर (Mumbai Water Cut) पाणी कपातीची टांगती तलवार आहे. मुंबईला (Mumbai News) पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाचे आगमन लांबल्यास मुंबईत पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. जून, जुलैच्या पावसावर (Rain Updates) पाणी कपाती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेच्या (BMC News) वतीनं करण्यात आलं आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सद्यस्थितीमध्ये 37 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. सातही धरणांची एकूण पाणीसाठा क्षमता 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर त्यापैकी सद्यस्थितीत 5 लाख 45 हजार 198 दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा या सातही तलावांमध्ये आहे. जून आणि जुलैमध्ये पाऊस किती पडतो? यावर पाणीपुरवठ्याचे नियोजन ठरणार आहे. 

 सद्यस्थितीत 31 जुलैपर्यंत मुंबईला पाणी पुरेल तशा प्रकारचे नियोजन जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आलं आहे. मागील वर्षी मुंबईत पाऊस चांगला झाला आणि मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली होती. ऑक्टोबररच्या अखेरीस धरणांमध्ये 97 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली, असं वाटत होतं. मात्र अद्याप एप्रिल महिना सुरूही झालेला नसताना धरणांतील पाणीसाठा 37 टक्क्यांवर आला आहे.

मागील वर्षी याच महिन्यामध्ये साती धरणातील पाणीसाठा जवळपास 40 टक्क्यांपर्यंत होता. त्यामुळे उन्हाळ्याचे दोन महिने आणि त्यानंतर पुढील जून जुलै असे दोन महिने असे एकूण चार महिने या धरणातील पाणीसाठ्यावर मुंबईकरांना काढावे लागणार आहेत. 

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणांतून मुंबईला पाणीपुरवठा होत असतो. दर दिवशी 3800 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात या सातही तलावातून केला जातो. यावर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तरी जून आणि जुलैमध्ये किती पाऊस पडतो, त्यावर मुंबईच्या पाणी कपाती संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. 

जल बोगद्याच्या कामामुळे मुंबई, ठाण्यात 30 एप्रिलपर्यंत पंधरा टक्के पाणी कपात

जल बोगद्याच्या कामामुळे मुंबई आणि ठाण्यात आजपासून पासून 30 एप्रिलपर्यंत पंधरा टक्के पाणी कपात केली जाणार आहे. आजपासून ते 30 एप्रिलपर्यंत जल बोगद्याच्या दुरुस्तीचे काम ठाणे येथे सुरू असल्यानं पंधरा टक्के पाणी कपातीचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जल बोगद्याच्या ठाणे येथील कुपनलिकेच्या खोदकामामुळे आणि वाचून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. 

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर ढगाळ वातावरण होत आहे. दरम्यान, आज राज्याच्या विविध भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर काही ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी (Farmers) अति भीती बाळगण्याचं कारण नाही. मात्र, सावधानता बाळगावी असं आवाहन खुळे यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mumbai Water Cut:  मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 31 मार्चपासून 30 दिवस 15 टक्के पाणीकपात, जाणून घ्या याचं कारण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget