एक्स्प्लोर
Advertisement
परीक्षा सुरु झाली तरी हॉलतिकीट नाही, मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार
मुंबई विद्यापीठाचा निकालाचा गोंधळ ताजा असतानाच आता हॉलितिकीटचा गोंधळ समोर आला आहे. पेपर सुरु झाला तरी अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देण्यात आलेलं नाही.
मुंबई : निकालाचा गोंधळ संपत नाही तोवरच मुंबई विद्यापीठाचा आणखी एक भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाने पुढील परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यामध्ये आजपासून प्रथम वर्षाच्या 'एटीकेटी'मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु झाली आहे.
पेपर आज सकाळी 11 वाजता असताना अद्याप अनेक विद्यार्थ्यांना हॉलतिकीटच देण्यात आलेलं नाही. परीक्षांचे हॉलतिकीट वेबसाईटवर उपलब्ध नसल्याची तक्रार अनेक महाविद्यालये आणि विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून करत आहेत.
मात्र, विद्यापीठाने याची कोणतीही दखल न घेता, हॉलतिकिटाच्या प्रश्नाबाबत 'एमकेसीएल' ला संपर्क करावा, असं म्हणत हात झटकले आहेत. या गोंधळामुळे अनेकांना आज सकाळी परीक्षेच्या 1 तास अगोदर हॉलतिकीट महाविद्यालयातून देण्यात आली.
दरम्यान काही विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु झाली तरी हॉलितिकीट मिळालं नाही. परिणामी आसन क्रमांकानुसार विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं. त्यामुळे आम्ही अभ्यास करावा, की हॉलतिकीट बाबत तक्रारी करत बसाव्यात? असा सवाल संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement