पूर्नमूल्यांकन फी कमी करुनही मुंबई विद्यापीठाकडे तब्बल अडीच कोटी रुपये जमा
या मुंबई विद्यापीठाच्या मागील वर्षीच्या गोंधळामुळे 35 हजार विद्यार्थी चुकीने नापास करण्यात आले. मात्र, या पूर्नमूल्यांकनासाठी मागील वर्षी विद्यार्थ्यांकडून एकूण 4 कोटी 83 लाख रुपये विद्यापीठाने जमा झाले होते.
मुंबई : मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिकांच्या पूर्नमूल्यांकनाबाबतची यावर्षीची माहिती समोर आहे. 2018-19 या वर्षांमध्ये मुंबई विद्यापीठाला पूर्नमूल्यांकनातून 2 कोटी, 36 लाख, 39 हजार, 880 रुपये विद्यार्थ्यांकडून जमा झाले आहेत. तर फोटोकॉपीमधून 6 लाख, 77 हजार, 440 रुपये जमा केले आहे.
मुंबई विद्यापीठाने पूर्नमूल्यांकन फीमधून 550 हून 250 रुपये केल्यानंतरसुद्धा जवळपास अडीच कोटी रुपये मुंबई विद्यापीठाला या पूर्नमूल्यांकन प्रक्रियेतून मिळाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी काढली आहे.
याआधी सुद्धा विद्यार्थ्यांची पूर्नमूल्यांकनातून मोठ्या प्रमाणावर लूट होत असल्याचा आरोप विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनानी केल्या होता. विद्यार्थी नापास होतात आणि पास होण्यासाठी उत्तरपत्रिका पूर्नमूल्यांकनासाठी देतात. त्यात या प्रक्रियेसाठी एका विद्यार्थ्यांकडून विद्यापीठाकडून 250 रुपये इतके शुल्क घेतले जात आहेत.
या मुंबई विद्यापीठाच्या मागील वर्षीच्या गोंधळामुळे 35 हजार विद्यार्थी चुकीने नापास करण्यात आले. मात्र, या पूर्नमूल्यांकनासाठी मागील वर्षी विद्यार्थ्यांकडून एकूण 4 कोटी 83 लाख रुपये विद्यापीठाने जमा झाले होते. - 2015-16 या वर्षात पूर्नमूल्यांकनातून विद्यार्थाकडून जमा झालेली रक्कम - 2 कोटी, 67 लाख 45 हजार 664 रुपये - 2016- 17 या वर्षात पूर्णमूल्यकनातून विद्यार्थाकडून जमा झालेली रक्कम - 4 कोटी 83 लाख 30 हजार 490 रुपये - 2017 -18 या वर्षात पूर्नमूल्यांकनातून विद्यार्थाकडून जमा झालेली रक्कम – 3 कोटी 49 लाख 64 हजार 73 रुपयेविद्यापीठ या जमा झालेल्या रुपयांचं करतात तरी काय? याबाबत माहिती का मिळत नाही? चुकीने नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ का लुबाडतय? जर विद्यार्थी पूर्नमूल्यांकनात पास झाला तर ही चूक तपासणाऱ्याची असताना विद्यार्थ्यांचे पैसे का परत केले जात नाहीत? असे अनेक प्रश्न समोर असताना यावर कारवाई व्हावी अशी मागणी मागील वर्षी पासून केली जात आहे.