एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री स्वीकारणार?
![उद्धव ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री स्वीकारणार? Mumbai Uddhav Thackeray Challenge To Cm Devendra Fadnavis उद्धव ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री स्वीकारणार?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/02/10175702/CM_Uddhav.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री आणि माझी जुगलबंदी होऊन जाऊ द्या, असं आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी परळमधील प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
आरशासमोर उभे राहा, शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार : मुख्यमंत्री
केंद्रीय आर्थिक पाहणीच्या अहवालात पारदर्शी कारभारामध्ये मुंबई महापालिकेला शून्य गूण मिळाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. तो दावा खोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना एकाच व्यासपीठावर समोरासमोर येण्याचं आव्हान दिलं आहे. बदनामी करुन मुंबई जिंकता येणार नाही : उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे म्हणाले की, "केंद्रीय आर्थिक पाहणीच्या अहवालात आमचं शहर पहिल्या क्रमांकावर आहे. हे आमचं मुंबई महापालिकेतील काम आहे आणि मग हा रिपोर्ट पाहा. मी हा रिपोर्ट बनवलेला नाही. हा अधिकृत आहे. सत्यमेव जयते. कशाला सत्याच्यापुढे अ लावून असत्यमेव जयते करताय. असत्य कधी जिंकणार नाही. तुमच्या थापा मुंबईकरांना पटणार नाहीच. मुंबईकरांसमोर एकाच व्यासपीठावर बोलूया, मी आणि मुख्यमंत्री जुगलबंदी होऊन जाऊ द्या. माझी तयारी आहे. जुगलबंदी कसली तर आम्ही केलेल्या कामांची. मी केलेल्या कामांपैकी एक तरी काम तुम्ही करुन दाखवा, माझं जाहीर आव्हान आहे." शिवसेनेच्या भाषणात मराठी माणूस, पण कर्तव्यात नाही : मुख्यमंत्रीअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)