एक्स्प्लोर

Mumbai Torres Jewellers Fraud: टोरेस कंपनीने लाखो मुंबईकरांना 200 रुपयांचा मोईसॅनाईट स्टोन 7000 रुपयांना विकला

Torres Scam Mumbai: रविवारी पैसे गुंतवा, शुक्रवारपर्यंत घसघशीत रिटर्न्स; टोरेस कंपनीने मुंबईतील हजारो गुंतवणुकदारांना चुना कसा लावला?

मुंबई: एका आठवड्यात घसघशीत परताव्याचे आमिष दाखवून टोरेस या कंपनीने लाखो मुंबईकरांना गंडा घातल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. नववर्षाच्या सुरुवातीला उघड झालेल्या या घोटाळ्यात लाखो मुंबईकरांनी आपले पैसे गमावले आहेत. टोरेस ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीचे बनावट दागिने विकण्याचा व्यवसाय करत होती. रविवारी पैसे गुंतवल्यानंतर गुरुवार ते शुक्रवारपर्यंत गुंतवणुकदारांना झटपट पैसे परत दिले जायचे. टोरेस कंपनीने मुंबईत सहा अलिशान कार्यालये उघडली होती. याठिकाणी मोठ्याप्रमाणावर असलेला कर्मचारी वर्ग आणि सेटअप पाहून बहुतांश गुंतवणुकदारांना टोरेस कंपनीच्या विश्वासर्हतेबद्दल खात्री पटली होती. 

पोलिसांच्या प्राथमिक तपासात टोरेस कंपनी आपल्या ग्राहकांना कशाप्रकारे भुलवत होती, याच्या अनेक सुरस कहाण्या समोर आल्या आहेत. टोरेस कंपनीकडून आपल्या ग्राहकांना एक बनावट हिरा दिला जायचा. मोईसॅनाईट  स्टोन नावाने ओळखला जाणाऱ्या या हिऱ्याची किंमत 200 ते 300 रुपये इतकी होती. मात्र, टोरेस कंपनी हा मोईसॅनाईट  स्टोन सहा ते सात हजारांना विकत असे. ग्राहकांनी मोईसॅनाईट  स्टोन खरेदी केल्यास त्यांना 9 टक्के रक्कम बोनस स्वरुपात दिली जात होती. याशिवाय, टोरेस कंपनीच्या सेमिनार्समध्ये ग्राहकांना भेटवस्तू, दागिने दिले जात असत. या सगळ्या दिखाव्याला भुलून अनेक ग्राहक टोरेस कंपनीत जास्तीत जास्त पैसे गुंतवत गेले आणि सर्वकाही गमावून बसले.

गेल्या काही दिवसांपासून टोरेस कंपनीकडून एक नवी ऑफर जाहीर करण्यात आली होती. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी होती. या कालावधीत गुंतवणूक करणाऱ्यांना कार, मोबाईल आणि 40 ते 60 टक्के इतका बोनस देण्याचे आमिष कंपनीकडून दाखवण्यात आले. त्यामुळे या काळात अनेक गुंतवणुकदारांनी बाहेरुन पैसे उधार घेऊन टोरेस कंपनीत गुंतवले आणि त्यांचा घात झाला.

टोरेस कंपनीच्या सर्वेश सुर्वेला पोलिसांनी डोंगरीतून उचलला

टोरेस कंपनीचा घोटाळा उघड झाल्यानंतर सर्वेश सुर्वे याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सर्वेश सुर्वे हा टोरेस कंपनीत आधारकार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्याला कंपनीचा संचालक बनवण्यासाठी त्याचे नाव, आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर करण्यात आला. त्याला महिन्याला 22 हजार रुपये पगार मिळत होता. मुंबई पोलिसांनी सर्वेश सुर्वे याला डोंगरीतील उमरखाडी परिसरातून ताब्यात घेतले होते. 

टोरेस हा ज्वेलरी ब्रँड प्लॅटिनम हर्न प्रा. लिमिटेड ही कंपनी चालवत होती. दादर, गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरारोड अशा सहा ठिकाणी टोरेस कंपनीच्या शाखा होत्या. या सहा शाखांमध्ये सुमारे सव्वालाख गुंतवणुकदारांनी हजारो कोटी रुपये गुंतवल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आणखी वाचा

कुणी कर्ज काढून पैसे गुंतवले, लाखो मुंबईकरांची टोरेसकडून फसवणूक, पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 08 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Torres Scam : पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
Maharashtra Live Updates: गँगस्टर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार, 28 दिवसांचा पॅरोल मंजूर, वाचा राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स एकाच क्लिकवर
Maharashtra Live Updates: गँगस्टर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार, 28 दिवसांचा पॅरोल मंजूर, वाचा राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स एकाच क्लिकवर
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Embed widget