एक्स्प्लोर
मुंबईत तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे, पालिकेचा निर्णय
मुंबई : महिला किंवा पुरुषांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात तृतीयपंथीयांना सहन करावी लागणारी कुचंबणा यापुढे टळणार आहे. मुंबईत आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत.
सार्वजनिक स्वच्छतागृहांत आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. भविष्यात याची व्याप्ती वाढवून त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालयेही बांधण्याबाबत महापालिका विचार करत आहे.
आतापर्यंत स्वच्छतागृहांमध्ये तृतीयपंथीयांचा विचार झाला नव्हता. मात्र दरम्यानच्या काळात महिला आणि पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृह असावे, अशी मागणी जोर धरु लागली होती.
महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यासोबत शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे आणि 'राइट टू पी'च्या प्रतिनिधींची सप्टेंबरमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी हा मुद्दा मांडण्यात आला होता. त्याला पालिका आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
क्राईम
Advertisement