मुंबईकरांना दिलासा! कोरोनाची लाट ओसरतेय, रविवारी 2250 रुग्णांची नोंद
Coronavirus In Mumbai: मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 34 हजार 833 वर पोहचलीय. यापैकी एकूण 9 लाख 95 हजार 786 जण कोरोनामुक्त झालेत आणि 16 हजार 535 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय.
![मुंबईकरांना दिलासा! कोरोनाची लाट ओसरतेय, रविवारी 2250 रुग्णांची नोंद Mumbai reports 2250 new COVID19 cases, 217 recoveries, and 13 deaths in the last 24 hours. मुंबईकरांना दिलासा! कोरोनाची लाट ओसरतेय, रविवारी 2250 रुग्णांची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/6f2d090830009da0cf0b80a628bc7e9b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Coronavirus In Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 2250 नव्या रुग्णांची वाढ झालीय. तर, 13 मृत्युची नोंद करण्यात आलीय. याशिवाय, 217 जणांनी कोरोनावर मात केलीय. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 34 हजार 833 वर पोहचलीय. यापैकी एकूण 9 लाख 95 हजार 786 जण कोरोनामुक्त झालेत आणि 16 हजार 535 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 19 हजार 808 रुग्ण सक्रीय आहेत.
मुंबईत मागील काही दिवसांपासून स्थिरावलेली कोरोना रुग्णांची संख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. मुंबईत काल (शनिवारी) 4 हजारांहून कमी रुग्ण आढळून आले होते. शनिवारी 3 हजार 568 रुग्ण आढळून आले होते. तर, 10 जणांचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाला आहे. याचबरोबर 231 जणांनी कोरोनावर मात केली होती. कालच्या तुलनेत आजची रुग्ण संख्या दिलासादायक आहे. मुंबईतील रुग्ण संख्येत हळूहळू घट होऊ लागल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. लवकरच मुंबईतील रुग्णसंख्या अटोक्यात येईल, असा विश्वासही मुंबई महानगरपालिकेनं व्यक्त केलाय.
कोरोनाचा नवा विषाणू असणाऱ्या ओमायक्रॉनचे रुग्ण जगभरात आढळत आहेत. भारतातही रुग्ण वाढत असून महाराष्ट्रात शनिवारी (22 जानेवारी) ओमायक्रॉनची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. नव्या 416 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामधील सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबई महापालिका क्षेत्रात आढळली असून मुंबईमध्ये तब्बल 321 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईपाठोपाठ नागपूरात 62, पुण्यात 13, वर्ध्यात 12, अमरावतीत 6 आणि भंडारा, नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2759 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1225 रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1009 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही मुंबई शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल पुण्यात 1002 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
हे देखील वाचा-
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)