Omicron In Mumbai: मुंबईत ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, आज आणखी चार नवे रुग्ण आढळल्यानं प्रशासनाचे दाबे दणाणले
Omicron In Mumbai: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगभरात धुमाकूळ घातलाय.
Omicron In Mumbai: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमायक्रॉननं जगभरात धुमाकूळ घातलाय. दरम्यान, भारतातही ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच मुंबई शहरातंही ओमायक्रॉनबाधितांचा आकडा वाढू लागलाय. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, शहरात आज ओमायक्रॉनचे चार नवे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी दोन जण कर्नाटकचे तर, एक औरंगाबाद आणि दुसरा दमनचा रहिवाशी आहेत. त्यांनी यूके आणि टांझानियातून प्रवास केल्याची पार्श्वभूमी आहे.
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं आरोग्य विभाग आणि सरकारसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. तसेच जगभरातही ओमायक्रॉन व्हेरियंट वेगाने पसरत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह (South Africa) ब्रिटेन (Britain) आणि युरोपमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
खबरदारीचा उपाययोजना म्हणून कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल केले. त्यांचे नमुने जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, एकही रुग्ण गंभीर स्थितीत नाही. ओमायक्रॉनबाधित रुग्णांपैकी 13 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलाय. मुंबई महानगर पालिकेनं याबाबत माहिती दिलीय.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 83 हजार 913 वर पोहोचली आहे. अशातच महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून 4 लाख 77 हजार 422 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (शनिवारी) 7469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 78 हजार 940 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Omicron Variant : भारतात फेब्रुवारीत येणार कोरोनाची तिसरी लाट?, कोविड सुपरमॉडेल समितीचा इशारा
- Covid Cases: ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहा:कार, तीन दिवसांत दोन लाख 60 हजार नव्या रुग्णांची नोंद
- Omicron Cases : 11 राज्यात ओमायक्रॉनचे 101 रुग्ण; महाराष्ट्रात 32 पैकी 25 जणांची ओमायक्रॉनवर मात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती