Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain News : पहिल्याच पावसाचा जोर पाहता नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दादरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे.
![Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात साचलं पाणी Mumbai Rain Update News Water accumulated in Dadar TT area marine Drive marathi news Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, दादर टीटी परिसरात साचलं पाणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/09/89194a25846e0d87ae665e04f32c18141717955750693322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईत आज मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai Rain News) विविध ठिकाणी संध्याकाळपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर, काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळत आहे. दादर टीटी परिसरात पाणी साचलं आहे.
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई
पहिल्याच पावसाचा जोर पाहता नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दादरमध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे. पूर्व उपनगरातही पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या मरीन ड्राईव्ह परिसरात रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. उद्या सुद्धा मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दादर टीटी परिसरात साचलं पाणी
मुंबईत सुरु झालेल्या पावसामुळे गरमीने त्रस्त असल्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा यामुळे अनुभवायला मिळणार आहे. मुंबईसह पूर्व उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ठाण्याच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा करावा लागतोय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)