Mumbai Police Order : मुंबई पोलिसांकडून 15 दिवसांचा अलर्ट, जमावबंदीसह नवीन मार्गदर्शक सूचना जारी
Mumbai Police Order : मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यांच्या 1 ते 15 तारखेपर्यंत आदेश जारी केले आहेत. जमावबंदीसह मुंबई पोलिसांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Mumbai Police Order : मुंबई (Mumbai) शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नोव्हेंबर महिन्यांच्या 1 ते 15 तारखेपर्यंत आदेश जारी केले आहेत. देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातील शांतता, कायदा आणि सुव्यवस्था, दंगल, मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती आणि विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. जमावबंदीसह मुंबई पोलिसांनी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
हा आदेश 1 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता (दुपारी 00.01 वाजता सुरु होणारा) 15 नोव्हेंबर 2022 ते रात्री 12 वाजेपर्यंत लागू करण्यात आला आहे. हा आदेश 15 दिवसांसाठी आहे, जो पुनरावलोकनानंतर पुढे वाढवला देखील जाऊ शकतो.
15 दिवसात कोणत्या घटना घडणारा याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही
दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या 15 दिवसांत नेमक्या कोणत्या घटना घडणार आहेत, याचा खुलासा मुंबई पोलिसांनी केलेला नाही. विविध यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आदेश कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जारी करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
मुंबई पोलिसांच्या आदेशानुसार पाचपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या 15 दिवसांमध्ये कोणत्याही सभा आणि मेळाव्यात लाऊडस्पीकर, डीजे, वाद्ये वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
या आदेशातून वगळण्यात आलेले कार्यक्रम आणि ज्या क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे ते पुढीलप्रमाणे आहेत...
- लग्न समारंभ किंवा विवाह संबंधित कार्यक्रम
- अंत्यसंस्काराच्या वेळी लोकांची गर्दी
- नियमानुसार खाजगी कंपनी, सहकारी संस्था यांसारख्या संस्थांची बैठक
- सामाजिक बैठक, क्लब, सोसायटीच्या बैठकीत नियमांनुसार सर्वसाधारण सभा
- चित्रपटगृह, थिएटर किंवा खुल्या उद्यानात नाट्य संमेलन
- शासनाचे कार्यक्रम, स्थानिक स्वराज संस्था
- शाळा, महाविद्यालय, सामान्य व्यवसाय कार्यक्रम किंवा अधिवेशन
- ज्या कार्यक्रमांना पोलीस आयुक्त किंवा पोलीस विभागाकडून कार्यक्रम मिळाले आहेत.
पोलिसांच्या परवानगी किंवा योग्य परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे शस्त्र, तलवार किंवा प्राणघातक शस्त्र बाळगल्यास कारवाईचा आदेश देण्यात आले आहेत.
- कोणत्याही प्रकारची स्फोटके ठेवणे किंवा वाहून नेणे.
- दगड किंवा कोणत्याही शस्त्राचे जतन करणे
- कोणत्याही पुतळ्यासह, चित्रासह आंदोलन करणे
- सार्वजनिक टीकाटिप्पणी, सार्वजनिक ठिकाणी गाणी वाजवणे
- शालीनता किंवा शिष्टाचाराचे उल्लंघन करणारे बॅनर, पोस्टर, चित्र, वस्तू तयार करणे, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे.
- शस्त्र बाळगणाऱ्या सरकारी नोकरांना हा आदेश लागू नाही.
- खाजगी रक्षक, सुरक्षा रक्षक, साडेतीन फूट उंचीपर्यंतचे लाकडाची काठी वापरुन काम करणारे रक्षक यांना हा आदेश लागू नाही.
परवानगीशिवाय लोकांना जमा करणाऱ्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. आदेशाच्या प्रति सार्वजनिक ठिकाणी चिटकवून, लाऊडस्पीकर किंवा मेगाफोनद्वारे घोषित करुन तसंच उपलब्ध कोणत्याही स्वरुपाच्या माध्यमाद्वारे प्रकाशित केला जाईल.
VIDEO : Mumbai Police : 1 ते 15 नोव्हेंबरपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर निर्बंध : मुंबई पोलीस