एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई रस्ते घोटाळा, गूगल मॅपच्या सहाय्याने आरोपींचा शोध
मुंबईः अनोळखी शहरातला रस्ता किंवा ठिकाण शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर केला जातो. मात्र याच गूगल मॅपने मुंबई पोलिसांना रस्ते घोटाळ्यातील आरोपींपर्यंत पोहोचण्याचा रस्ता दाखवला आहे. गूूगल मॅपने खेचलेल्या फोटोंमुळं रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांचं बिंग फुटलंय.
अस्तित्वात नसलेल्या राडारोडाच्या वाहतूकीसाठी, कंत्राटदारांनी 800 कोटीचं बिल वसूल केल्याचं समोर आलं आहे. रस्ते बांधताना निर्माण झालेला राडा रोटा नेमका कुठं टाकण्यात आला?, असा सवाल कंत्राटदार, इंजिनीअर आणि कर्मचाऱ्यांना विचारण्यात आला, त्या प्रश्नाचं उत्तर देताना सर्वांनी नवी मुंबईकडे बोट वळवलं आहे.
मुंबईला खड्ड्यात घालणारे कंत्राटदार
- तेजस शाह हे रेलकॉनचे डायरेक्टर आहेत. या कंपनीने 13 रस्त्य़ांच्या कामात घोटाळा केल्याचा आरोप आहे.
- जीतेंद्र किकावत, महावीर इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर. या कंपनीवर 4 रस्त्यांच्या घोटाळ्यांचा आरोप आहे.
- नलिन गुप्ता, जे. कुमार इन्फ्रा प्रोजेटक्टचे डायरेक्टर. या कंपनीनं मुंबईतल्या डझनभर रस्त्यांच्या बांधकामात हेराफेरी केल्याचं बोललं जात आहे.
- नरेंद्र मधानी, आर. के. मधानी ग्रुपचे पार्टनर. यांनी देखील 7 रस्त्यांची बांधणी करताना घोटाळ्याचा मार्ग पत्करल्याचं समोर आलं आहे.
- नितीन शाह, आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्टसचे डायरेक्टर यांनी मुंबईतले 9 रस्ते बांधले. मात्र ते बांधताना हेराफेरी केल्याची चर्चा आहे.
- के. आर. कन्स्ट्रक्शनचे पार्टनर कोनार्क शाहांना 12 रस्त्यांचं कंत्राट मिळालं होतं. मात्र ते सर्व रस्ते उभारताना त्यांनी भलामोठा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement