Mumbai : दिवाळीत फटाक्यांसोबत पोलिसांच्या 'ट्रिंग ट्रिंग'चा आवाज, 5000 हून अधिक तक्रारीचे फोन
Mumbaikars Bursting Firecrackers : मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी रात्रीपासून तर पहाटेपर्यंत 5000 हून अधिक तक्रारीचे कॉल आले होते. लाईन बिझी असल्यामुळे अनेक कॉल घेता सुद्धा आले नाही.
Mumbai Noise Pollution : मुंबईकरांनी रविवारी संध्याकाळी एकीकडे दिवाळीचा (Diwali 2023) सण साजरा करत फटाके फोडण्यास सुरुवात केली आणि दुसरीकडे सतत वाजत असलेला आणखी एक आवाज ऐकू आला तो म्हणजे मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाच्या फोनचा (Mumbai Police Control Room). सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी रात्रीपासून तर पहाटेपर्यंत 5000 हून अधिक तक्रारीचे कॉल आले होते.
दिवाळीत फटाक्यांसोबत पोलिसांच्या 'ट्रिंग ट्रिंग'चा आवाज
मुंबई पोलिसांना आलेल्या तक्रारीनुसार, पहाटेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती.सतत वाजणारे फटाक्यांचा आवाजाने मुंबईकर हा कंटाळून कंट्रोल रूमवर कॉल करत होते आणि याची तक्रार करत होते. लाईन बिझी असल्यामुळे अनेक कॉल घेता सुद्धा आले नाही. कॉल लागत नसल्याने नागरिकांनी ट्विटरचा माध्यम सुद्धा तक्रार करण्यास सुरुवात केली. फटाक्यांच्या आतषबाजीच्या आवाजाला कंटाळून नागरिक फोन करत होते.
दिवाळीत मुंबईकरांकडून जोरदार आतषबाजी
मुंबईत प्रदूषणाचा स्तर खालावत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवा असे आदेश जारी केले. मुंबई पोलिसांनी वारंवार आव्हान सुद्धा केले होते. मात्र, न्यायालयांचा मुंबईकर आदेशचे उल्लंघन करताना पाहायला मिळालं. रात्री 10 वाजेपासून सुरुवात झालेले कॉल पहाटेपर्यंत सुरू होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद
यंदाच्या दिवाळीत मुंबईत सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली आहे. आवाज फाऊंडेशनने मरीन ड्राइव्हवरील फटाक्यांचा आवाज रेकॉर्ड केला तो 117 डेसिबलपर्यंत आहे. मालाडमध्ये हवेचे प्रदूषणही खूप वाईट आहे. दादर, वांद्रे कार्टर रोड आणि कुलाबा येथेही फटाक्यांच्या आवाजाचे मोजमाप करण्यात आले.
गेल्या तीन वर्षांतील उच्चांक
आवाज फाऊंडेशनने, मरीन ड्राईव्हवरील नोंदवलेला फटाक्यांचा आवाज 117 डेसिबल इतका नोंदवला आहे, हा आवाज 2021 आणि 2022 च्या तुलनेत सर्वाधिक आहे. याशिवाय मुंबईत दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मालाडमध्ये सर्वाधिक वायू प्रदूषणाची नोंद झाली. यंदा मुंबईत सर्वाधिक ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली असून गेल्या तीन वर्षांतील उच्चांक आहे.