Mumbai Metro : मेट्रो 7 आणि 2A ला नवा मुहूर्त; जानेवारी 2022 पासून मेट्रो धावणार
Mumbai Metro : ऑक्टोबर 2021 पर्यंत या फेजचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. यात बदल होऊन पुढील वर्षाचा मुहूर्त साधण्यात येतोय. मेट्रो 2A हा मार्ग 17.5 किमीचा आहे तर मेट्रो 7 हा मार्ग 18.6 किमीची आहे.
मुंबई : शहराला अधिक वेगवान बनवणाऱ्या मेट्रो 7 आणि 2A च्या पहिल्या फेजची सुरुवात पुढील वर्षी म्हणजे जानेवारी 2022 पासून होणार आहे. त्या आधी ऑक्टोबर 2021 पर्यंत या फेजचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं. यात बदल होऊन आता पुढील वर्षाचा मुहूर्त साधण्यात येतोय. मेट्रो 2A हा मार्ग 17.5 किमीचा आहे तर मेट्रो 7 हा मार्ग 18.6 किमीची आहे. या लाईनचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झालं असल्याचं एमएमआरडीएने सांगितलं आहे.
पुढच्या आठवड्यापासून आरडीएसओ या लखनऊच्या कंपनीकडून मेट्रो लाईनच्या कामाचे तांत्रिक परिक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून ऑक्टोबरपासून याचे परिक्षण करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 31 मे रोजी मेट्रो लाईन 7 च्या आरे ते दहिसर या मार्गावरील चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यावेळी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत पहिला टप्पा सुरु होईल असं सांगितलं गेलं होतं. पण आता त्यात बदल करण्यात आला आहे.
मुंबईत 2014 मध्ये पहिली मेट्रो सुरु झाली होती, त्यानंतर लगेचच मेट्रो 2A आणि मेट्रो 7 कडे वाटचाल सुरु झाली. दोन्ही मेट्रो मार्गावर दररोज एकूण 12 लाख प्रवासी प्रवास करु शकतील असा एमएमआरडीएचा अंदाज आहे. या मेट्रोमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक 25 टक्क्याने कमी होईल. या मेट्रोला चालकाची गरज नाही, मात्र सुरुवातीला काही दिवस चालक असेल असंही सांगितलं जातंय.
संबंधित बातम्या :
- मिठागराच्या 'त्या' जागेची मालकी नेमकी कुणाची? कांजूरमार्ग मेट्रो 3 कारशेडच्या वादावर आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात
- Navi Mumbai Metro : मेट्रो रेल्वेच्या परिचालन आणि देखभालीकरिता महामेट्रोला स्वीकारपत्र; लवकरच करारनामाही केला जाणार
- Metro : कारशेडबाबतचा घोंगडं अजूनही भिजत; पर्यायी जागांचा विचार करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना