एक्स्प्लोर

Navi Mumbai Metro : मेट्रो रेल्वेच्या परिचालन आणि देखभालीकरिता महामेट्रोला स्वीकारपत्र; लवकरच करारनामाही केला जाणार

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशानं सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईत उभा राहत असलेली मेट्रो रेल्वे गेल्या 10 वर्षांपासून रखडली असल्याने याची जबाबदारी काही महिन्यांपुर्वी महामेट्रो कंपनीकडे देण्यात आली होती. या अनुशंगाने आज सिडकोकडून महामेट्रो कंपनीला परिचालन आणि देखभालीकरिता स्वीकारपत्र देण्यात आले. या संदर्भात लवकरच सिडको आणि महा मेट्रो यांच्यात करारनामा करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आणि नवी मुंबईतील नोड परस्परांना अधिक सुलभरीत्या जोडले जावेत, या उद्देशाने सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण 4 उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) विकसित करण्यात येत आहेत. त्यांपैकी 11.10 कि.मी. च्या 11 स्थानकांसह तळोजा येथे आगार असलेलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्गांवर मेट्रोची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

सद्यस्थितीत मार्ग क्र. 1 वर उभारण्यात येणाऱ्या 11 स्थानकांपैकी 1 ते 6 स्थानकांच्या उभारणीची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रकल्पासाठी आर्थिक स्रोत निर्माण करणे, तसेच या क्षेत्रातील महामेट्रोचा अनुभव आणि कार्यकुशलता विचारात घेऊन सिडकोने महा मेट्रोची नियुक्ती केली. महामेट्रो कंपनीस नुकत्याच यशस्वीरीत्या कार्यान्वित झालेल्या नागपूर मेट्रो टप्पा 1 आणि पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या मार्ग क्र. 1 आणि 2 च्या बांधणी, अंमलबजावणी आणि परिचालन आणि निगराणीचा अनुभव आहे. या मार्गाच्या अभियांत्रिकी सहाय्यासाठी महा मेट्रोकडून 20 तज्ज्ञ अभियंत्यांच्या गटाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदर मार्गावरील परिचालन आणि देखभाल सेवांकरिता सिडकोला रु. 885 कोटी इतका खर्च अंदाजित आहे. सदर खर्च संपूर्ण महाराष्ट्रात तुलनात्मकरित्या सर्वात कमी आहे. महामेट्रोशी परिचालन आणि देखभाल सेवा प्रदान करण्याच्या कराराचा कालावधी हा, या मार्गावर वाणिज्यिक परिचालन सुरु होण्याच्या तारखेपूर्वी 1 वर्ष आणि वाणिज्यिक परिचालन सुरु झाल्याच्या तारखेपासून पुढील 10 वर्षे इतका असणार आहे. सदर मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबईकरांना लवकरच पर्यावरणस्नेही आणि आरामदायक प्रवासाचा एक उत्तम पर्याय निर्माण होणार आहे.

महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आल्यानंतर या मार्गावरील कामे वेगाने पूर्ण होऊन, लवकरच या मार्गावर प्रवासी सेवा सुरु करणे शक्य होईल. सिडकोच्या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांना गती देणे हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे. त्याचाच प्रारंभ मेट्रो प्रकल्पाच्या या महत्वपूर्ण निर्णयाने झाला असल्याचे सिडको एम. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
नीट पेपरफुटी, ठाकरे बंधूंकडून मोर्चात एकत्र येण्याची तयारी; दुसरीकडे दंगलफेम अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार
सळसळतं रक्त थंड होऊ देऊ नका, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, आदित्य ठाकरे आक्रमक, 24 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्रीत राष्ट्रगीत गायन करणार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget