Mumbai Building collapse : मुंबईच्या कुर्ला परिसरातील इमारतीचा भाग कोसळला, दुर्देवी घटनेत पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, तीन जण जखमी
Mumbai Building collapse: जखमींवर कुर्ला येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींमध्ये सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
Mumbai Building collapse: मुंबईच्या (Mumbai) कुर्ला (Kurla) परिसरातील इमारतीचा भाग कोसळल्यानं (Building Collapse) दुर्देवी घटना घडलीय. इमारतीचा भाग हॉटेलवर कोळसला, ज्यात पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. तर, तीन जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही इमारत म्हाडाची इमारत असल्याची माहिती समोर आलीय. ही तळमजला अधिक एक मजली इमारत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त इमारत मुंबईच्या कुर्ला परिसरातील विनोबा भावे पोलीस ठाण्याजवळील आहे. आज दुपारी या इमारतीच्या पहिल्या माजल्यावरचा भाग तळमजल्यावर असलेल्या हॉटेलवर कोसळला. या दुर्घटनेत पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. तर, तीन जण जखणी झाल्याची माहिती मिळत आहे. रफीक शेख (वय 46), इरफान खान (वय, 33) आणि मोहम्मद जिकरान (वय, 6) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर कुर्ला येथील भाभा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
या घटनेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर अग्निशमन यंत्रणा, पोलीस, रुग्णवाहिका आणि पालिकेच्या एल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी मदतकार्यासाठी पोहोचले. त्यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतलं. या घटेनंतर परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झालंय.
हे देखील वाचा-
- Mumbai Building Fire : मुंबईतील रॉयल पार्क परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
- Knight Frank Index: मुंबईत सरासरी 350 घरांच्या खरेदीसाठी नोंदणी; नाईट फ्रॅन्क इंडियाचा अहवाल
- हॉटेलमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, वसईमधील घटनेने खळबळ
- Mumbai Electricity Issue : मुंबईतील अनेक भागात वीज काही वेळासाठी गायब! लोकललाही फटका, तासाभरानंतर वीजपुरवठा पूर्ववत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha