हॉटेलमध्ये सापडला तरुणीचा मृतदेह, वसईमधील घटनेने खळबळ
वसई येथील हॉटेलमध्ये 26 वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तिच्या डोक्यावर अज्ञात वस्तूने प्रहार केल्याचा पोलिसांना संशय आहे.
Vasai : वसईतील एका हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. मयत तरूणी आपल्या मित्रा सोबत काल दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये आली होती. आज सकाळी रूम न उघडल्याने हॅाटेल मालकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रूमचा दरवाजा उघडला. त्यावेळी ही घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करुन तरुणाचा शोध सुरु केला आहे.
वसई पश्चिमेच्या एका हॅाटेलमध्ये 26 वर्षीय तरूणीचा मृतदेह सापडला आहे. मृत तरूणी रविवारी दुपारी दीडच्या सुमारास या हॅाटेलमध्ये आली होती. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तिचा मित्र हॅाटेल बाहेर आला. त्याने ड्रिंक केली आणि त्यानंतर तो हॉटेलमधून निघून गेला, अशी माहिती मिळत आहे.
सोमवारी सकाळपासून रूम मधून काहीच हालचाल न झाल्याने हॅाटेल मालकाने पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला. त्यावेळी संबंधित तरूणी रक्ताच्या थारोळ्यात बेडवर दिसली. तिच्या डोक्यावर अज्ञात वस्तूने प्रहार केल्याचा पोलिसांना संशय आहे. बेडवर रक्ताचा सडा पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर तरूणीला हॉटेलमध्ये घेऊन आलेला मित्र फरार झाला आहे. त्याला अटक केल्यानंतच या हत्येचा उलघडा होईल. संबंधित तरूणीचा मृत्यू कशामुळे झाला आणि सोबत आलेला मित्र फरार का झाला? याबाबतच पोलीस तपास करत असून लवकरच या घटनेचा तपास करून तरूणीचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळेल, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Hit and Run Case: हिट अॅण्ड रन प्रकरण: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; मृतांच्या कुटुबीयांच्या नुकसानभरपाईत आठपटीने वाढ
- Russia Ukraine Crisis : रशिया-युक्रेन युद्धाने मद्यप्रेमींची 'झिंग' उतरणार? बीअरचे दर वाढण्याची भीती
- Fuel Price : इंडियन ऑइलचा झटका; 'या' देशात पेट्रोलच्या दराचे द्विशतक, भारताचे काय?
-
Medical Emergency साठी तासभरात मिळतील हक्काचे एक लाख; जाणून घ्या योजना