Mumbai Building Fire : मुंबईतील रॉयल पार्क परिसरातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Mumbai Building Fire : मुंबईतील रॉयल पार्क परिसरातील इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Mumbai Building Fire : मुंबईमधील कांजूरमार्ग येथील एनजी रॉयल पार्क परिसरातील इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
विक्रोळी कांजूरमार्ग पूर्व येथील एनजी रॉयल पार्कमधील इमारतीच्या 11 व्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या, चार जंबो टँकर, दोन अन्य टँकर, रुग्णवाहिका आणि इतर मदत घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. इमारतीच्या बी विंगच्या 10 व्या आणि 11 व्या मजल्यावर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Maharashtra: A level 2 fire breaks out in NG Royal Park area in Kanjurmarg of Mumbai. Around 10 fire tenders are present at the spot. Fire fighting operations are underway. pic.twitter.com/qUGk4j4Crd
— ANI (@ANI) February 28, 2022
अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. इमारतीमधील सर्व लोकांना बाहेर काढण्यात आले असून या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. ही आग लेवल दोनची असून आग लागलेल्या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही आग कशामुळे लागली याचे अद्याप कारण समोर आले नाही. परंतु, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाच वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबई शहरात आगीच्या घटना घडण्याचे सत्र सुरुच आहे. यापूर्वीही मुंबईतील जुहू परिसरात नारायण राणे यांच्या बंगल्याजवळ एका इमारतीला आग लागली होती. शिवाय बोरिवली परिसरातीस चिकूवाडीमध्ये एका इमारतीला मोठी आग लागली होती. ताडदेव, करी रोड येथेही आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आज कांजूरमार्ग येथील इमारतीला आग लागली आहे.
महत्वाच्या बातम्या