Mumbai Electricity Issue : मुंबईतील अनेक भागात वीज काही वेळासाठी गायब! लोकललाही फटका, तासाभरानंतर वीजपुरवठा पूर्ववत
Mumbai Electricity Issue : मुंबईतील अनेक महत्वाच्या भागात वीज गायब झाली होती. सीएसएमटी, दादर, वरळीसह विविध भागात वीजपुरवठा खंडित झाला होती.
Mumbai Electricity Issue : मुंबईतील अनेक महत्वाच्या भागात वीज गायब झाली होती. सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अंटोप हिल, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, अशा विविध भागात वीजपुरवठा खंडित, गेल्या अर्ध्या ते एक तासापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे लोकल ट्रेन देखील ठप्प झाल्या आहेत. मुलुंडमधील ट्रॉम्बे येथील वीजपुरवठा करणारी टाटाची केबलमध्ये तांत्रिक अडचण निर्मा झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. मुंबईच्या बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडीत, टाटाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. एका तासातनंतर वीजपुरवठा सुरळीत आहे.
वीजपुरवठा खंडीत झाल्याने मध्य रेल्वे काही काळ ठप्प झाली होती. वीजपुरवठा खंडीत झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र, आता मध्य रेल्वेवर लोकल सेवा सुरुळीत सुरु झाली आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. हार्बर मार्ग मेगा ब्लॉकमुळे बंद आहे. इतर सर्व कॉरिडॉरवर गाड्या धावत असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
Power supply tripped momentarily on HB and Main line from 9.49-52am.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) February 27, 2022
Trains are running on all corridors.
मुंबईत सीएसएमटी, भुलेश्वर, ताडदेव, परेल, सायन, वडाळा, अंटोप हिल, दादर, लालबाग, मस्जिद, वरळी, अशा विविध भागात वीजपुरवठा खंडित, गेल्या अर्ध्या ते एक तासापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. एक तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Disha Salian Case : दिशा सालियनच्या आई-वडिलांची राणे पितापुत्रांविरोधाच महिला आयोगाकडे तक्रार
- Narayan Rane : नारायण राणे दिशा सालियानची बदनामी करतायत; महापौरांची महिला आयोगाकडे तक्रार, चौकशी सुरु
- Disha Salian Case : दिशा सालियानची मृत्यूनंतर नारायण राणेंनी बदनामी केल्याचा आरोप, महिला आयोगाकडून दखल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha