Mumbai News : लोअर परेलमध्ये ट्रेड वर्ल्ड इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, नऊ जण जखमी
Mumbai News : मुंबईतील लोअर परेलमध्ये लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. सोळा मजल्याच्या या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळल्याची माहिती आहे.
Mumbai News : मुंबईतील (Mumbai) लोअर परेलमध्ये (Lower Parel) लिफ्ट कोसळल्याची (Lift Collapse) घटना घडली. सेनापती बापट मार्ग कमला मिल इथल्या ट्रेड वर्ल्ड इथे ही दुर्घटना घडली. सोळा मजल्याच्या या इमारतीमध्ये चौथ्या माळ्यावरुन ही लिफ्ट खाली कोसळल्याची माहिती आहे. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या ग्लोबल आणि केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची प्रकृती स्थिर असून कोणीही गंभीर जखमी नसल्याची माहिती आहे.
लिफ्ट इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तळमजल्यावर कोसळली
आज सकाळी 10 वाजून 49 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. ट्रेड वर्ल्डमधील सी विंगमधील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन तळमजल्यावर लिफ्ट कोसळली. यात 12 ते 14 जण जखमी झाले. सर्व जखमींना सुरक्षा पर्सनलद्वारे सुटका करण्यात आली. त्यापैकी 8 जखमींना ग्लोबल रुग्णालयात (Global Hospital) पाठवण्यात आलं तर एका जखमीला केईएम हॉस्पिटलमध्ये (KEM Hospital) पाठवण्यात आलं. तर इतर चार किरकोळ जखमींनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.
जखमींची नावं
प्रियंका चव्हाण (वय 26 वर्षे), प्रतीक शिंदे (वय 26 वर्षे), अमित शिंदे (वय 25 वर्षे), मोहम्मद. रशीद (वय 21 वर्षे), प्रियांका पाटील (वय 28 वर्ष), सुधीर सहारे (वय 29 वर्षे), मयूर गोरे (वय 28 वर्षे), तृप्ती कुबल (वय 46 वर्षे) अशी जखमींची नावं असू सर्वांची प्रकृती स्थिर आहेत. त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर किरण विश्वनाथ चौकेकर (वय 48 वर्षे) या जखमीला केईएम रुग्णालयात दाखल केलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मे महिन्यात मुंबईत हायड्रॉलिक लिफ्ट कोसळण्याच्या दोन दुर्घटना
मागील महिन्यात मुंबईतील चेंबूरमधील (Chembur) डीके सांडू मार्ग इथल्या स्वस्तिक फ्लेअर इमारतीमधील हायड्रॉलिक लिफ्ट सर्व्हिसिंग सुरु असताना हाऊस कीपिंग कर्मचाऱ्यावर कोसळली. या दुर्घटनेत योगेश जाधव या 40 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने देखभालीचे काम करणाऱ्या जेडीबी कंपनीच्या विशाल भोसले आणि इतर कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.
तर 2 मे रोजी अशीच दुर्घटना घाटकोपरमधील (Ghatkopar) हाऊसिंग सोसायटी घडली होती. हायड्रॉलिक कार लिफ्टच्या सर्व्हिसिंगचं काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्यावर लिफ्ट कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणीही पंतनगर पोलीस ठाण्यात देखभालीचे काम करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.
हेही वाचा
Dombivali : एस.एस.टी.वेद्यरत्न रुग्णालयातली लिफ्ट कोसळली; कोरोना रुग्णांसह तिघे जखमी