एक्स्प्लोर

Mumbai Metro 3 : मुंबईच्या पोटात तंत्रज्ञानाची कमाल, अशी आहे नवी लाइफलाईन मेट्रो अॅक्वा लाईन

Mumbai Metro 3 Aqua Line : मुंबईच्या पोटातून नवी लाईफलाइन मेट्रो-3 धावणार आहे. ही मेट्रो अॅक्वा लाईन आहे तरी कशी? त्याची वैशिष्ट्ये काय?

Mumbai Metro 3 : मुंबई :  गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये जमिनीखालून धावणाऱ्या मेट्रो-3  मार्गाचे म्हणजेच अॅक्वा लाईनचे काम सुरू आहे. या मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्या दृष्टीने वेगात काम सुरू झालेले आहे. याच पहिल्या टप्प्यात मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला जोडलेले टी-टू टर्मिनल (Airport T-2 Terminal) स्टेशन आहे. याच स्टेशनवर भारतातली सगळ्यात उंच आणि सगळ्यात लांब एस्केलेटर बसवण्यात आले आहेत. तर इंजीनियरिंग मार्वल असलेले सहर क्रॉस ओव्हर देखील या स्टेशन पासून जवळच आहे. 

T2 टर्मिनल स्टेशन हे अॅक्वा लाईनच्या पहिल्या टप्प्यात असलेले टी टू  टर्मिनल स्टेशन अतिशय महत्त्वाचे स्थानक मानले जात आहे. हे स्थानक म्हणजे एक कमर्शियल हब असणार आहे. मेट्रोचे हे स्थानक थेट मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात आलेले आहे. तसेच मुंबई मेट्रो सेव्हन लाईन देखील याच स्थानकाच्या बाजूला आहे. या स्थानकाच्या वर 14 माळ्यांची कमर्शियल ऑफिसेस असणारी इमारतदेखील असणार आहे. तसेच शॉपिंग मॉल देखील उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो सुरु झाल्यानंतर सर्वाधिक गर्दी याच स्थानकात असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

भारतातले सर्वात लांब आणि सर्वात उंच Escalators टी टू टर्मिनल या स्थानकात बसवण्यात आले आहेत. यांची उंची 14 मीटर पेक्षा लांब आणि लांबी 41 मीटर पेक्षा लांब आहे. हे बसवण्यासाठी देखील मोठे कष्ट घ्यावे लागले आहेत. 

टी टू टर्मिनल स्टेशन हे मुंबईतील भुयारी स्थानकांपैकी सर्वात खोलवर असलेले स्टेशन आहे. मात्र, असे असले तरी देखील या स्टेशनवर अनेक सोयी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. काचेचे बंद दरवाजे, शुद्ध हवा आत येण्यासाठीचे एक्झॉस्ट सिस्टीम, आग लागल्यास अद्यावत अग्निशमन यंत्रणा आदी अशा प्रकारे विविध सोयी इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जमिनीच्या इतक्या खोलवर देखील आपल्याला मोबाईलची रेंज मिळणार आहे. त्यामुळे मोबाईल देखील वापरता येईल. 

मुंबईच्या जमिनीखाली बनवण्यात येत असलेली अॅक्वा लाईन म्हणजे एक दिव्य आहे. मात्र हे करत असतानाच अनेक मोठमोठी आव्हाने देखील या इंजिनियर्सच्या समोर होती. त्यापैकी एक सर्वात मोठे आव्हान म्हणजे सहार क्रॉस ओव्हर. ज्या ठिकाणी मेट्रो एका ट्रॅक वरून दुसऱ्या ट्रॅकवर जाऊ शकते त्या ठिकाणाला क्रॉस ओव्हर असं म्हणतात. सहार इथले क्रॉस ओवर बनवण्यासाठी भारतात पहिल्यांदाच एनएटीएम ही टेक्नॉलॉजी वापरण्यात आली. मात्र हा क्रॉस ओव्हर बनवणे तितकेसे सोपे नव्हते. 

'अॅक्वा लाईन'साठी सहार क्रॉस ओव्हर ही महत्त्वाची भूमिकादेखील बजावणार आहे. या क्रॉस ओव्हरचा वापर करूनच एखादा तांत्रिक बिघाड झाला असेल, तर एका मागे एक मेट्रो उभ्या राहणार नाहीत आणि त्यामुळे जमिनी खालची वाहतूक ही थांबणार नाही तर उशिराने का होईना पण सुरू राहणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : दिवसभरातील टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 02 July 2024 : ABP MajhaRahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget