एक्स्प्लोर

शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंतांच्या हत्येचा पर्दाफाश

एसआरए प्रकल्पाच्या वादातून शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : मुंबईतील मालाड पूर्व भागातले शिवसेनेचे माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात कुरार पोलिसांना यश आलं आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून सावंत यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हत्येच्या कटातील मुख्य आरोपी, दोन शूटर आणि चौघे साथीदार अशा सात आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सचिन सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख होते. मालाडमधील एसआरए प्रकल्पाच्या वादातून सचिन सावंत यांची 10 लाख रुपयांची सुपारी देऊन ही हत्या घडवण्यात आली. मुंबईतील विविध भागात घरं देण्याचं आमिष शूटर्सना देण्यात आलं होतं. मुंबईत शिवसेनेच्या माजी उपशाखाप्रमुखाची हत्या लोकेश देवेंद्र सिंग, अभय ऊर्फ बारक्या किसन साळुंखे, सत्येंद्र ऊर्फ सोनू रामजी पाल, निलेश रमाशंकर शर्मा, ब्रिजेश ऊर्फ ब्रिजा नथुराम पटेल, ब्रिजेश श्रीप्रकाश सिंह आणि अमीत निरंजन सिंह अशी या सात आरोपींची नावं आहेत. ब्रिजेश पटेल मुख्य आरोपी असून लोकेश आणि अभय हे शूटर असल्याची माहिती आहे. निलेश रामशंकर शर्मा हा सचिन सावंतांचा जवळचा मित्र होता, मात्र एसआरए प्रकल्पातील वादामुळे तो प्रतिस्पर्धी गटात सामील झाला. कुरार पोलिसांनी मालाड आणि उत्तर प्रदेशमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या सर्वांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. काय आहे प्रकरण? 22 एप्रिल रोजी क्रांतीनगरात शाखेची मिटींग संपल्यानंतर सचिन सावंत सहकारी जगन्नाथ वर्मासोबत बाईकवरुन गोकुळनगरला जात होते. त्यावेळी सचिन सावंत यांना काही जणांनी हाक मारली आणि तीन राऊंड गोळ्या झाडल्या. सचिन सावंत यांना महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Air Quality Marathi News: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल
जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल

व्हिडीओ

Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपची माणसं; चौकशी व्हावी, मराठा समाजाला न्याय देण्याबाबत शिंदेंचं योगदान, रामदास कदमांचा टोन बदलला, म्हणाले 'जरांगे साहेब...'
Vishwajeet Kadam: सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेतील समझोता एक्स्प्रेसचा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर होणार का? विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेज पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Embed widget