Mumbai Local : एवढी मस्ती कशाला पाहिजे? धावत्या लोकलला लटकून तरूणाचा जीवघेणा स्टंट; Video Viral
Mumbai Local Train Stunt : लोकल ट्रेनच्या दारात लटकून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. आरपीएफला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई : लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train Stunt) टवाळखोरांची स्टंटबाजी नवी नाही. त्यातल्या त्यात हार्बर रेल्वे मार्गावर तर अशा टवाळखोरांची सुळसुळाट आहे. अशाच टवाळखोरांची स्टंटबाजी (Stunt) पुन्हा एकदा समोर आली आहे.लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शिवडी रेल्वे स्थानकात लोकलला लटकून जीवघेणी स्टंटबाजी केली.या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. रेलवे पोलिसांकडून स्टंट करणाऱ्या टवाळखोराचा शोध सुरु असून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लोकल ट्रेनच्या दारात लटकून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. आरपीएफला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नाही तर ह तरूण धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करत चढला आहे. हा लटकलेला तरूण कोण आहे, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र अशा हुल्लडबाजांमुळे इतरांना जास्त त्रास होतो. तरूण स्टंट करत असताना स्थानकावरील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे अशा स्टंटबाजांवर आळा घालायला हवा. कारण हे स्वत:ची तर माती करुन घेतातच, पण त्यांच्यामुळे अन्य निष्पापांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या व्हिडीओत दिसणारे हुल्लडबाज कुठे दिसतील, तर पोलिसांना कळवा.
मध्य रेल्वेचं प्रवाशांना महत्त्वाचं आवाहन
मध्य रेल्वेकडून प्रवाश्यांनाही सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या स्टंटमुळे स्टंट करणाऱ्यास तसेच इतर प्रवाशांच्या जीवाला देखील धोका होत असल्याने स्टंटबाजी न करण्याचं मध्य रेल्वेकडून आवाहन करण्यात आलं आहे.
21 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल
लोकलच्या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यापैकी अनेकांचा स्वतःच्याच चुकीमुळे जीव गमवावा लागत असल्याचंही समोर आलं आहे. 21 सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरपीएफने त्याची चौकशी सुरु केली आहे. हा व्हिडोओ नेमका कधीचा आहे याचा तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही. परंतु चुकूनही अशी स्टंटबाजी करु नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकलने प्रवास करताना काळजी घ्या
जवळपास सगळेच मुंबईकर लोकलने रोज प्रवास करतात. कामाच्या वेळा, घरी जाण्याची लगबग आणि त्यात घडलेल्या अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावलेत. काहींना कायमचं अपंगत्व आलंय. त्यामुळे जीवावर बेतेल असा प्रवास करु नका. लोकलने प्रवास करताना आपली काळजी घ्या.
Viral Video :
View this post on Instagram
हे ही वाचा :
VIDEO Belapur Local Accident : स्टेशनमध्ये धडकलेल्या लोकलने तिला जागीच चिरडलं, पुढे जे घडलं ...