VIDEO Belapur Local Accident : स्टेशनमध्ये धडकलेल्या लोकलने तिला जागीच चिरडलं, पुढे जे घडलं ...
Mumbai Local Train Accident : आपल्यासोबत काय घडलंय? आपण जिवंत आहोत का? हे तिला कदाचित कळलंच नसावं. पण गाडी जेव्हा मागे सरकली तेव्हा तिला आयुष्यातला सगळ्यात मोठा हादरा बसला.
Belapur Local Accident : रविवारी रात्री, मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस (Mumbai Rain) झाला. ठिकठिकाणी पाणी साचलं आणि मुंबईची तुंबई झाली. तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं जनजीवनही विस्कळीत झालं होतं. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल उशिरानं धावत होती. स्टेशनवर प्रचंड गर्दी. सोमवार असल्याने गर्दी अधिकच होती. सकाळी दहाची वेळ, ऑफिसला जाण्याऱ्यांची लगबग. प्लॅटफॉर्मवर प्रवासी लोकलची वाट पाहत उभे होते. प्लॅटफॉर्म खचाखच भरलेलं होतं. लोकल प्लॅटफॉर्ममध्ये धडकली आणि तेवढ्यात रोहिणी यांचा तोल गेला, त्या ट्रॅकवर पडल्या. तिथं उपस्थित असलेल्या प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला. स्टेनमध्ये धडकलेल्या लोकलने त्यांना जागीच चिरडलं. अगदी थोडक्यात त्यांचा प्राण वाचला पण या अपघातात त्यांनी आपले दोन्ही पाय कायमचे गमावले.
लोकलखाली सापडलेल्या रोहिणी यांचं काय झालं असेल? हे कल्पना करणं ही कठीण आहे. मोटरमनने लोकल हळूहळू मागे घेतली. प्लॅटफॉर्मवरील प्रवाशी डोळे लावून होते. काही क्षणात रोहिणी दिसल्या. त्या जिंवत होत्या, पण पुढे जे घडलं ते काळजाचा ठोका चुकवणारं होतं.
गाडी मागे गेल्याचं पाहून रोहिणी यांनी उठण्याचा प्रयत्न केला. पण आपले पाय पाहून त्यांना धक्का बसला. हा अपघात इतका भीषण होता की यात रोहिणी यांचे दोन्ही पाय गेले.
कामानिमित्त बाहेर पडल्या अन्...
रोहिणी बोटे या विवाहित असून त्या 25 वर्षांच्या आहेत. नवी मुंबईतील तळोजा परिसरात त्या राहायला आहेत. घरकाम करुन त्या कुटुंबाला आधार देत होत्या. सोमवारी ठाण्याला काम असल्यानं त्या बेलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर लोकलची वाट पाहत उभ्या होत्या आणि तिथेच त्यांच्यासोबत हा हादरवणारा अपघात घडला.
लोकलने प्रवास करताना काळजी घ्या
जवळपास सगळेच मुंबईकर लोकलने रोज प्रवास करतात. कामाच्या वेळा, घरी जाण्याची लगबग आणि त्यात घडलेल्या अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावलेत. काहींना कायमचं अपंगत्व आलंय. त्यामुळे पोहचायला उशिर झाला तरी चालेल पण जीवावर बेतेल असा प्रवास करु नका. लोकलने प्रवास करताना आपली काळजी घ्या.
ही बातमी वाचा:
VIDEO : Belapur Local Accident : स्टेशनमध्ये धडकलेल्या लोकलने तिला जागीच चिरडलं, पुढे जे घडलं..